महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्री माननीय नामदार धर्मरावबाबा आत्राम यांचा दिनांक १६ ऑगस्ट बुधवार रोजी आरमोरी येथे दौरा आयोजीत करण्यात आलेला आहे.
सकाळी ११:३० वाजता गडचिरोली येथून आरमोरिकडे प्रयाण, दुपारी १२:०० वाजता विश्राम भवन आरमोरी येथे आगमन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक, दुपारी १२:३० वाजता माजी आमदार हरिरामजी वरखडे यांच्या शक्तीनगर आरमोरी येथील निवासस्थानी भेट, दुपारी १: ३० वाजता सुनिल नंदनवार, तालुका कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या काळागोटा आरमोरी येथील निवासस्थानी भेट देणार आहेत आहेत.
उपरोक्त दौरा कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अमीन लालानी, तालुका कार्यकारी अध्यक्ष सुनील नंदनवार, शहर कार्याध्यक्ष प्रदीप हजारे यांनी केले आहे