कारंजा : आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये सर्वत्र महाविकास आघाडीचे उमेद्वार निवडून येऊन, महाविकास आघाडीचे सरकारच विजयी होणार हे त्रिवार सत्य आहे. आजची परिस्थिती पहाता हे कटूसत्य कुणीही नाकारू शकत नाही. तसेच महाविकास आघाडी मध्ये निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची संख्या कितीही असली तरी वडिलांपासून कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाशी नाळ जुळलेल्या आणि कारंजा कर्मभूमी असलेल्या सुनिल पाटील धाबेकर यांनाच महाविकास आघाडीची उमेद्वारी हमखास मिळणार हे कटूसत्य आहे. कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात तसेही पाटील कुणबी मराठा समाजाचे प्राबल्य आहे. शिवाय या मतदार संघात पाटील,कुणबी,मराठा, बहुजन,मुस्लीम,गवळी इत्यादी समाजाचा केवळ आणि केवळ सुनिल पाटील धाबेकर यांनाच पाठींबा आहे. सुनिल पाटील धाबेकर हे सहकार नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचे वडील दिवंगत योजनामहर्षी स्व . बाबासाहेब धाबेकर यांनी या मतदार संघाचे सलग दोन वेळा यशस्वी नेतृत्व केलेले आहे.
शिवाय विधानसभेत नेतृत्व करीत असतांना त्यांनी राज्यमंत्रीमंडळात राज्य मंत्री म्हणूनही पद भूषवीले आहे. त्यांच्या कारकिर्दीतच कारंजाची बाजारपेठ मतदारसंघातील प्रत्येक खेड्यापाडयाशी जोडल्या गेली. प्रत्येक खेड्यातील रस्त्याची बांधनी आणि डांबरीकरण स्व. बाबासाहेब धाबेकर यांनी स्वतः बारकाईने लक्ष देऊन करून घेतले. तसेच पिंप्री फॉरेस्टच्या धरणामधून डायरेक्ट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाईपलाईन टाकून कारंजा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवीला. स्व. बाबासाहेब धाबेकर हे दुरदृष्टी ठेवून भविष्याचा वेध घेणारे सक्षम नेतृत्व होते.त्यांचे गुण त्यांचे उत्तराधिकारी सुनिल पाटील धाबेकर यांच्यामध्ये आहेत.आज रोजी कारंजा मानोरा मतदार संघाचे प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याकरीता त्यांच्या सारख्या सक्षम नेतृत्वाची नितांत गरज आहे.वाढत्या कमीशन खोरीला प्रतिबंध करून आणि अधिकारी वर्गावर वचक ठेवून, सर्वसामान्य जनसामान्यांची कामे करून देण्याचे धाडस त्यांच्यात आहे. कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील विकासकामे पूर्ण करून बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यास सक्षम आहेत. त्यामुळे अशा खंबीर नेतृत्वाला कारंजा मानोरा मतदार संघातील मतदाराची साथ मिळून ते विधानसभा निवडणूकीत विजयश्री खेचून आणतील. ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ असल्याचे मत माजी सरपंच प्रदिप वानखडे, दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी व्यक्त केले आहे.