पतंजली योग समिती, स्वाभिमान भारत यांच्या वतीने पतंजली योग दिनानिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कॉन्व्हेन्ट येथे योगसाधना शिबिर घेण्यात आले या निमित्त आयोजित कार्यक्रमात श्री.श्रावणजी बगमारे शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रकाशजी बगमारे यांनी पतंजली योग समिती व स्वाभिमान भारत याचे प्रतिनिधी योग शिक्षक श्री. भगवानजी कंनाके, प्रा. दिलीप जुमडे व निसर्गोपचार तज्ञ डॉ लोकेश मुळे,अड्याळ टेकडी यांनी विद्यार्थी व शिक्षक यांना योग प्राणायाम व निसर्गोपचार बद्दल उपयुक्त माहिती दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले व संस्थेचे वतीने त्यांचे स्वागत करून आभार व्यक्त केले. या प्रसंगी मान्यवरांनी विविध दाखले देऊन विद्यार्थ्यांना कृतिशील धडे दिले की ज्यांच्या त्यांच्या आयुष्यात नेहमी उपयोग पडेल याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले
या कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार पर्यवेक्षिका नीलिमा गुज्जेवार मॅडम यांनी उपस्स्थित मान्यवर व शिक्षिका व अन्य यांचे विशेष आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने नीलिमा गुज्जेवार,निशा मेश्राम,प्रगती शेंडे,वैशाली सोनकुसरे, योगिता नंदनवार,रंजना कोहळे,पिंकी ठाकरे,नीलम सेडमाके,वर्षा काटेखाये ,मेघा राऊत,संजय नागोसे,घर्षणा सेलोकर यांनी विशेष परिश्रम घेतले