प्राप्त अर्ज 93167 झालेत पैकी 89396 अर्जं मंजूर झाल्याचे ॲड ज्ञायक पाटणी यांच्या अध्यक्षेत घोषित करण्यात आलेत
कारंजा:- दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे कारंजा मानोरा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अध्यक्ष माननीय श्री ज्ञायक राजेंद्र पाटणी यांच्या अध्यक्षतेखाली कारंजा तहसील कार्यालयात मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातून प्राप्त अर्ज, कारंजा मानोरा तालुक्यातून प्राप्त अर्ज,मंजूर अर्ज ,प्रोसेस मध्ये असणारे अर्ज या संदर्भात आढावा घेण्यात आला. बैठकीस बैठकीस उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असणारी आकडेवारी यावेळी सादर केली असता प्रोसेस मध्ये असणारे अर्ज आज रोजी पूर्ण करण्यात यावे असे निर्देश यावेळी बैठकीस उपस्थित मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे नवनियुक्त अध्यक्ष माननीय श्री ज्ञायक पाटणी यांनी दिलेत. कार्यक्रमास उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रोसेस मध्ये असणारे अर्ज आणि यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास त्यावर ताबडतोब उपाय योजना करू असे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले. मतदार संघातील अर्ज करणारी कोणतीही लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी असे यावेळी ज्ञायक राजेंद्र पाटणी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. लाडक्या बहिणी योजनेचा आढावा घेतला असता बैठकीचे अध्यक्ष पाटणी यांनी समाधान व्यक्त करत आणखी वेगाने लाडक्या लाडक्या बहीण योजनेचे अर्ज प्राप्त करून घेऊन त्यांना योजनेचा लाभ देण्यात यावा असे सांगितले. या या बैठकीस कारंजा तहसीलदार माननीय श्री झाल्टे, मानोरा तहसीलदार माननीय श्री येवलेकर, अशासकीय सदस्य मंगलसिंग बैस, अशासकीय सदस्य जाकीर इसाक शेख, मानोरा गटविकास अधिकारी, कारंजा साहाय्यक गटविकास अधिकारीश्री घुगे, तुषार जाधव बाल विकास प्रकल्प अधिकारी कारंजा, श्री नन्नावरे बाल विकास अधिकारी मानोरा ईत्यादि सह अन्य अधिकारी, कर्मचारी
उपस्थित होते यावेळी नव नियुक्त अध्यक्ष व व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले . प्राप्त माहितीनुसार कारंजा तालुकात नारी शक्ती ॲप द्वारे 33808 अर्ज प्राप्त झाले असुन मंजूर 33622 झालेत तर MLD न्यू ॲप द्वारे 20546 प्राप्त आणि मंजूर 19858 कऱण्यात आले आहेत. असे एकूण प्राप्त 54354आणि मंजूर 53480 यापर्वी कऱण्यात आलेत. तर आजच्या या बैठकीत 38813 अर्ज मंजूर करण्यात कऱण्यात आल्याचे सांगण्यात आले.यावेळी ज्ञायक पाटणी यांच्या सोबत भाजपा पदाधिकारी मंगेश धाने, वाडेकर आदी उपस्थीत होते.असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख यांनी कळविले.