कारंजा : वाशिम जिल्हयातील श्री गुरुदेव सेवा मंडळ मोझरीचे आजिवन प्रचारक कारंजाचे विजय पाटील खंडार, समाजप्रबोधनकार संजय कडोळे, पत्रकार दामोधर जोंधळेकर तसेच युवा समाजसेवी चंद्रकात चव्हाण यांनी, नुकतीच अमरावती जिल्हयातील गुरुकुंज मोझरीला भेट देत
राष्ट्रसंत गुरुदेव तुकडोजी महाराजांच्या पवित्रपावन समाधी स्थळाचे दर्शन घेऊन, शांती सलोख्याकरीता, सामुदायिक प्रार्थना केली . यावेळी गुरुकुंज मोझरी येथील गुरुदेव प्रेमी आजिवन प्रचारक यांनी संजय कडोळे यांना आश्रमाची पुस्तीका भेट दिली