कै.ज्ञानेश्वर गणेशराव वाकोडे, तालुका कार्यक्रम सहाय्यक, ता. अकोट यांना कोवीड-१९ संक्रमणामुळे झालेल्या मृत्यूमुळे त्यांच्या पत्नी व कुटूंबियास ५० लक्ष रुपये सानुग्रह अनुदानाचा धनादेश मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अकोला यांच्या कक्षात मा. आमदार रणधीर सावरकरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला..,
शासकीय सेवेत असतांना कोविड 19 च्या संक्रमणामुळे मृत्यू पावलेल्या शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या पीडित कुटुंबाला 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता त्यानुसार कै. ज्ञानेश्वर गणेशराव वाकोडे यांच्या पिडीत कुटूंबाकरीता महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण २०२२/प्रक्र ४८६/सेवा-५ मंत्रालय मुंबई दिनांक १७/१२/२०२३ अन्वये ५० लक्ष रूपये सानुग्रह अनुदान मंजूर केलेले होते, परंतु प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे पिडीत कुटूंबास आर्थिक मदत देण्या करिता प्रचंड विलंब लावण्यात आला याकरिता आमदार रणधीर सावरकर यांनी तत्कालीन सार्वजनिक आरोग्य मंत्री यांची सतत भेट घेऊन शासनासोबत पत्रव्यवहार करून तसेच आयुक्त सार्वजनिक आरोग्य यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सतत पाठपुरावा करून सुद्धा सदरची मदत कुटुंबाला देण्याबाबत प्रशासकीय यंत्रेकडून होत विलंब ही बाब अन्यायकारक असून नाहकच जनतेमध्ये शासनाप्रती असंतोष निर्माण करणारी आहे, ही बाब आमदार रणधीर सावरकर यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या निदर्शनास आणून देऊन पुन्हा पाठपुरावा करून मंजूर करून घेण्यात आलेल्या 50 लाख रुपये सानूग्रह अनुदनाचा धनादेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात कै. ज्ञानेश्वर गणेशराव वाकोडे यांच्या पत्नी व त्यांच्या कुटुंबीयांना आमदार रणधीर सावरकर , जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी बळीराम गाढवे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला,