ज्येष्ठ पत्रकार दिनेश शुक्ल यांना पत्रकारिता जीवन गोरव तर माणिकराव कांबळे यांना पत्रकारिता गौरव पुरस्कार..!
अकोला:-- संघर्षमय परिस्थितीतून वाटचाल असतांना, पत्रकारिता,नोकरीत किती पैसे मिळतात याचीही चिंता न करता पत्रकार स्वत:पेक्षा दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची सामाजिक सेवा करीत असतात. समाजात काही लोकांना दुसऱ्याच्या आनंदाचं दु:ख असतं.परंतू पत्रकार मात्र अव्याहतपणे समाजासाठी काम करून लोकशाही जीवंत ठेवण्याचं काम करतात.ही त्यांची चळवळ नसून ईतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची वळवळ आहे.असे अनुभवसिध्द प्रतिपादन डवले शिक्षण समुहाचे प्रा.प्रकाश डवले यांनी अध्यक्षिय मनोगतातून केले.

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून आद्य पत्रकार स्व.बाळशास्त्री जांभेकर जन्मदिन व पत्रकार दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने पत्रकार दिनापासून विविध पुरस्कार वितरणाच्या उपक्रमाचा शुभारंभ केला.त्यामध्ये अकोला येथील ज्येष्ठ पत्रकार दिनेश शुक्ल यांना लोकस्वातंत्र्य पत्रकारिता जीवन गौरव, तर पत्रकार माणिकराव कांबळे यांना लोकस्वातंत्र्य पत्रकारिता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांना पुरस्कार स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र,शाल,दिनदर्शिका व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रा.डवले यांचाही सत्कार करण्यात आला.

सर्वप्रथम पत्रकार महासंघाच्या सामाजिक वाटचालीचे अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे बाबा यांना अभिवादन करण्यात आले.त्यानंतर आद्य पत्रकार,दर्पणकार स्व.बाळशास्त्री जांभेकर यांना हारार्पण ,वंदन करून अभिवादन करण्यात आले. देशातील शहिद जवान,दिवंगत पत्रकार,अत्त्याचारातील महिला बळी,आपत्ती व अपपघातग्रस्त आणि आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांना याप्रसंगी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी प्रा.डवले यांचेसह,पत्रकार दिनेश शुक्ल व माणिकराव कांबळे,यांची सत्कारमुर्ती तथा प्रमुख अतिथी म्हणून,तर लोकस्वातंत्र्य संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,उपाध्यक्ष प्रदीप खाडे, सचिव राजेन्द्र देशमुख यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती.

दिनेश शुक्ल यांनी परमेश्वराने आपणास लेखणीतून समाजाच्या समस्या सोडविण्याची शक्ती दिली.ही जाणीव ठेऊन पत्रकारांनी स्व.जांभेकरांच्या आदर्शांनी नैतिक पत्रकारितेतून प्रश्न सुटेपर्यंत सज्ज राहिलं पाहिजे असे मत दिनेश शुक्ल यांनी व्यक्त केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघातील सहभागी असलेल्या चांगल्या व्यक्तिमत्वांचा त्यांनी गोरव करून त्यांचेसह माणिकराव कांबळे यांनी सुध्दा लोकस्वातंत्र्यच्या वाटचालीला शुभेच्छा व्यक्त केल्या.संजय देशमुख यांनी स्व.जांभेकरांची तत्वाधिष्ठीत पत्रकारितेची आवश्यकता प्रतापादीत करून प्रास्ताविकातून संघटनेच्या वाटचालीचा आढावा वाषद केला. प्रदिप खाडे ,राजेन्द देशमुख यांनीही मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाला केन्द्रीय पदाधिकारी प्रा.डॉ.संतोषजी हुशे,कादंबरीकार पुष्पराज गावंडे,अंबादास तल्हार, सिध्देश्वर देशमुख, अॕड.विजयराव देशमुख,विजयराव बाहकर,के.एम.देशमुख,माजी सभापती मिलींद राऊत,अकोला जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर,ग्रामीण जिल्हाध्यक्ष सागर लोडम,सतिश देशमुख (निंबेकर)सचिव मनोहर मोहोड,विजय देशमुख,रमेश समुद्रे,गणेश कुरई,संघपाल सिरसाट,दिपक सिरसाट, अनिल मावळे,योगेश सिरसाट, सिरसाट, अनुराग अभंग,मनिष मिश्रा,किसन नाईक व अनेक पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन पुष्पराज गावंडे यांनी तर आभारप्रदर्शन संजय देशमुख यांनी केले. सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....