वाशिम - तळागाळातील शोषित, पिडीत आणि वंचित समाजाच्या विविध समस्या आणि प्रश्नांवर विचारमंथन करण्यासाठी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने सोमवार, १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक वाटाणे लॉन येथे भव्य भूमि हक्क परिषद व प्रसिध्द भिमगायीका कडूबाई खरात यांच्या भव्य भिमगितांच्या दणदणीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय सामाजीक न्यायराज्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले, उद्घाटीका म्हणून खा. भावनाताई गवळी, प्रमुख उपस्थितीमध्ये पालकमंत्री ना. संजय राठोड, पक्षाचे केंद्रीय संघटक भुपेश थुलकर, यांची उपस्थिती राहील. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे हे राहतील. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आ. राजेंद्र पाटणी, शिक्षक आ. अॅड. किरणराव सरनाईक, जि.प. अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे, भाजपाचे वाशिम यवतमाळ लोकसभा समन्वयक राजु पाटील राजे, जि.प. सभापती अशोक डोंगरदिवे, भाजपा जिल्हाध्यक्ष शाम बढे, उद्योजक देवेंद्र खडसे, विकास खडसे, जनसेवक संजु वाडे, रिपाइंचे मध्यप्रदेश अध्यक्ष राजेश खडसे, प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, प्रदेश संघटक सुधाकर तायडे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष मोहन भोयर, महेंद्र ताजणे आदींची उपस्थिती राहील. कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी १० वाजता ‘तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं.. ‘फेम प्रसिध्द भिमगायीका कडुबाई खरात यांचा भिमगितांचा दणदणीत कार्यक्रम होईल.
या परिषदेमध्ये शासनाने तात्काळ सर्व्हेक्षण करुन भूमीहिनांना अतिक्रमीत जमीनीचे पट्टे द्यावे, निराधार, श्रावणबाळ, वयोवृद्ध योजनेतील शासनाने जाचक अटी रद्द करुन गरीब लाभार्थ्यांना बंद पडलेले अनुदान तात्काळ द्यावे, एस.सी., एस.टी. ओबीसी, व्हिजेएनटी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत दुप्पट वाढ करुन नियमित देण्यात यावी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभीमान सबलीकरण योजनाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, कलावंतांचे प्रलिंबित मानधनाचे प्रस्ताव तात्काळ निकाली काहुन त्यांना न्याय द्यावा व मानधन समिती स्थापन करण्यात यावी तसेच कलावंतांना ५ हजार रुपये मानधन देण्यात येऊन त्यांच्या वयाची अट ४० वर्षे करावी, सर्व मागासवर्गीय विकास महामंडळाचे कर्ज माफ करण्यात यावे, ग्रामपंचायत मधील दलित वस्तीच्या निधीमध्ये वाढ करण्यात यावी, स्वाधार योजनेची अंमलबजावणी तालुकास्तरावर करुन जाचक अटी रह कराव्या, मागासवगीय मुला-मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह द्यावे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षाकरीता मोफत प्रशिक्षण केंद्र सुरु करावे, संपूर्ण महाराष्ट्रामधील प्रलंबित संविधान भवनासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, पदोन्नतीमधील आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, महाकवी वामनदादा कर्डक महामंडळ स्थापन करुन कलावंतांना न्याय द्यावा, अनुसूचित जातीतील घरकूल लाभार्थ्यांना अतिक्रमीत जागेचे ८ अ नियमानुकूल करुन द्यावे, अंगणवाडी सेविकांना अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त मोबाईल डाटा उपलब्ध करुन देण्यात यावा आदी मागण्यांवर विचारमंथन करुन या मागण्या सरकार दरबारी मांडण्यात येणार आहेत.
तरी या मेळाव्याला पक्षाचे सर्व आजीमाजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर व जनतेने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे आयोजक तथा जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे, जिल्हा कार्याध्यक्ष शेषराव मेश्राम, महासचिव कवि राठोड, अरविंद उचित, वाशिम तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव, कारंजा तालुकाध्यक्ष महादेव वानखेडे, मंगरुळपीर तालुकाध्यक्ष सत्यवादी खडसे, मालेगाव तालुकाध्यक्ष प्रकाश गवई, रिसोड तालुकाध्यक्ष हिरामन साबळे, मानोरा तालुकाध्यक्ष माणिकराव जामनिक, रवि इंगळे, हिरामण पाटील, राहुल इंगळे, विकास इंगळे, गजानन वानखेडे, संतोष वानखेडे, सुभाष वानखेडे, विष्णू वानखेडे आदींनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....