वरोरा-भद्रावती विधानसभा येथील युवसेना पदाधिकारी नियुक्ती करतांना विश्वासात न घेतल्याने, तसेच अंतर्गत गटबाजीला कंटाळून मनीष जेठानी यांनी युवा सेना पदाचा राजीनामा दिला. वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात पक्षाची ताकत आहे क्षेत्रात आमदार निवडून येण्याची परिस्थिती असतांना काही महिन्यांपासून संघटनेत गट बाजीला वेग आला आहे ,अनेक बदल त्यात करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी युवासेना वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील कार्यकारणीत देखील बदल करण्यात आले मात्र सदर बदल करतांना तसेच नवीन पदाधिकारी यांची यादी बनविण्यात युवा सेना पदाधिकारी मनीष जेठांनी यांना युवा सेना नागपूर विभागीय सचिव निलेश बेलखेडे यांनी विश्वासात न घेता सदर नियुक्ती करून घेतल्या.
युवासेना जिल्हा प्रमुख राहून जर कार्यकारणी माझ्या विश्वासातली नसेल तर मला काम करण्यास अडचण होईल ,त्यामूळे पक्षात नसलेल्यांना युवकांना पद बहाल करण्यात आल्याने त्याचे नुकसान येणाऱ्या निवडणुकीत होईल. याबाबत युवासेना पदाधिकारी मनिष जेठाणी यांनी
पदावर राहून पक्षाचा नुकसान बघू शकत नसल्याने आपला राजीनामा युवासेनेचे आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदनाव्दारे पाठविला आहे.
११ महिने पक्षाने जिल्हा प्रमुख म्हणून जवाबदारी दिली या साठी सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनापासून आभारहि मनिष जेठाणी यांनी पत्रकात मानले आहे.
या पत्रावर आपण दखल घेऊन गटबाजीला आळा घालाल तसेच या गटबाजी मुळे छोट्या कार्यकर्त्यांना होत असलेला त्रास कमी कराल अशी विनंती पत्रकात नमूद करण्यात आली आहे