कारंजा (संजय कडोळे जिल्हा प्रतिनिधी) : कारंजा येथील रहिवाशी डॉ रमेश चंदनशिव सेवा निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी यांची वाशीम जिल्ह्याच्या "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी" नियुक्ती झाल्याचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे.
पक्ष पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार,व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने सामाजिक न्याय विभगाचे राज्य प्रमुख आ.जयंतराव गायकवाड,राज्य उपाध्यक्ष पंडितराव कांबळे,उपाध्यक्ष रवि खिल्लारे ,प्रदेश सरचिटणीस अरविंद पवार,यांच्या शुभहस्ते विशेष कार्यक्रमात डॉ चंदनशिव यांचे नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात अकोला जिल्हा कार्याध्यक्ष योगेश सोनोने,वाशीम जिल्हा कार्याध्यक्ष धम्मकुश गायकवाड,व महाराष्ट्रातील असंख्य पदाधिकारी हजर होते.
पक्षाची विचारधारा,पक्ष बळकटीकरण व पक्ष मजबूत करण्यासाठी व सामान्य माणसापर्यंत पोहचण्याचे काम करून पक्षाने दिलेल्या जबादारिने काम करून सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन काम करण्याचे त्यांना सांगितले. असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेला मिळाले आहे असे जनसेवक संजय कडोळे यांनी कळवीले.