"नऊ दिवस विविध सांस्कृतीक व सामाजीक कायर्र्क्रम व स्पर्धा शांततेत शेकडो भाविकांना केले वृक्षांचे वाटप"
वाशिम - स्थानिक शुक्रवारपेठ भागातील बाळसमुद्र नवदुर्गा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गुरुवार, २६ ऑक्टोंबर रोजी आयोजित भव्य महाप्रसादाचा शहरातील हजारो भाविकांनी लाभ घेतला. सायंकाळी ५ वाजतापासुन सुरु झालेला महाप्रसादाचा कार्यक्रम रात्री १२ वाजेपर्यत अखंडपणे सुरु होता. महाप्रसादाच्या समारोपानंतर बाळसमुद्र प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांच्यासह भाविकांच्या सहभागातुन उत्साहात देवीचे विसर्जन करण्यात आले.
मंडळाचे पदाधिकारी राजु गंगाळे यांनी प्रारंभी देवीचे पुजन व आरती करुन शांततेत महाप्रसादाची सुरुवात केली. यावेळी शहरातील विविध भागातून आलेले नागरीक, महिला, जेष्ठ नागरीक आणि लहान बालकांनी महाप्रसाद ग्रहण केला. यावेळी बाळसमुद्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी शांततेत महाप्रसादाचे वितरण केले. या महाप्रसादाचा लाभ जवळपास दहा हजाराच्या वर भाविकांनी लाभ घेतला. सायंकाळी ५ वाजतापासुन सुरु झालेल्या अन्नदानाचा कार्यक्रम रात्री १२ वाजेपर्यत अखंडपणे सुरु होता. यावेळी मंडळाच्या सर्व सदस्यांसह परिसरातील भाविक भक्त व महिलांनी न थकता अखंडपणे या महाप्रसादाच्या कार्यक्रमात आपले श्रमदान दिले. महाप्रसादानंतर अत्यंत हर्षोल्हासात कनेरगाव नाका येथे नदीत देवीचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान नऊ दिवस मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले होते. विजेत्यांना बक्षीसांसह दररोज भाविकांना शेकडो वृक्षांचे वाटप करण्यात आले. ५१ आरत्यांची महाआरती, दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील बालकांचे गायन, नेत्र तपासणी शिबीर, छत्रपती क्रिडा मंडळ व बालासाहेब व्यायाम प्रसारक मंडळाचे साहसीक खेळ, हभप शितलताई सांगळे मारसुळकर यांचे किर्तन, दंतरोग तपासणी आदी विविध कार्यक्रम नऊ दिवस राबविण्यात आले. या उत्सवानिमित्त भव्य मंडप, आकर्षक रोषणाई व विहीरीवर रंगीबेरंगी पाण्याचे कारंजे हे दर्शनासाठी येणार्या भाविकांसाठी मुख्य आकर्षण ठरले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष निलेश व्यवहारे, उपाध्यक्ष विशाल उगले, कोषाध्यक्ष आशिष व्यवहारे, सचिव मोहन कोल्हे, राजु गंगाळे, अक्षय व्यवहारे, निखिल सदावर्ते, अविनाश व्यवहारे, अंकित व्यवहारे, अशोक काबरा, अक्षय व्यवहारे, राहुल ठाकरे, अमोल व्यवहारे, संदीप व्यवहारे, नितीन उचीतकर, प्रवीण ढवळे, गोलू व्यवहारे, विशाल गावंडे, मनोज व्यवहारे, नितीन शिवलकर, ईश्वर व्यवहारे, रामा इंगळे, अजिंय बेलपत्रे, अजय व्यवहारे, हरिओम गावंडे, सचिन व्यवहारे, सौरभ देवळे, अनिल व्यवहारे, गजु इंगळे, सचिन कोठेकर, शंकर व्यवहारे, संदीप व्यवहारे, राजु चव्हाण, अरविंद झुंजारे, अजय झंजाळकर, गणेश मारपुवार, पवन जाधव, रवि वानखेडे, योगेश ढवळे, अमोल व्यवहारे, रितेश गाभणे, कुणाल ठाकूर, सुशील गाभणे, वैभव गुंजकर, अनिकेत वानरे, संतोष व्यवहारे, मनीष अनसिंगकर, विशाल अनसिंगकर, संजू देवळे, धिरज कड, विशाल कोष्टी, प्रणव कोल्हे दशरथ इंगळे, अशोक काबरा, महेश ढवळे, वैभव गंगाळे, कुणाल स्वामी, अतुल घोले यांच्यासह बाळसमुद्र मित्रमंडळाचे पदाधिकारी, सदस्य व मित्रमंडळाने अथक परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....