रायगडमध्ये एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर येत आहे. येथील लोणेरे श्रीवर्धन मार्गावर कार अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कणघर गावा जवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणेरे श्रीवर्धन मार्गावर भरधाव येणारी कार झाडाला आदळली आणि नंतर पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका मुलाचा समावेश तर एक लहान मुलगा गंभीर जखमी आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. तसेच जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.