वरोरा दीड महिन्या आधी एका महिला अपघातात गंभीरित्या जखमी झाल्याने त्या महिलेला निराम न्यूरान हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले मात्र जवळचे पैसेही संपले आता करायचे का या मनस्थितीत असताना शेतकरी नेते किशोर डुकरे हे त्यांच्या मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी त्या महिलेसाठि महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मदत मिळवून दिली , सुनिता नागेश खंडाळे वय 34 असे महिलेचे नाव आहे
दिनांक 24 ऑगस्ट रोजी जखमी महिला सुनीता नागेश खंडाळे, रा. अशोक वाटिका, बोर्डा,वरोरा हिचा अपघात झाल्याने तरी तुमच्या तिला त्वरित उपचारा करिता न्यूरॉन हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले. त्यादरम्यान पती नागेश प्रभाकर खंडाळे यांनी अथक परिश्रम घेत जवळ असलेले सहा ते सात लाख रुपये खर्च केले.
जखमी महिलेमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा न दिसल्याने, तसेच आर्थिक तंगीत असलेल्या पतीने शेवटी नाईलाजास्तोव नागपूर येथील एम्स हॉस्पिटल इथे भरती केले, याची माहिती नेहमी सामाजिक कार्यात कार्यात अग्रेसर असणाऱ्या किशोर डुकरे या शेतकरी नेत्याने महिलेचे बंद पडलेले कार्ड तहसील कार्यालयातून त्वरित सुरू करून देऊन तीला महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना अंतर्गत मदत मिळवून दिली. सोबतच आमदार प्रतिभा ताई धानोरकर यांना माहिती कळतच त्यांनी पाच हजाराची मदत केली,शेगाव येथील माणुसकी जपणारे पोलीस कर्मचारी सुधीर मुळेवार यांनी दोन हजाराची , निखिल कौरासे यांनी एक हजार रुपयाची आर्थिक मदत दिली.
पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन नागरिकांचा विरोध असला तरीही या ठिकाणी काही माणुसकी धरून असलेले कर्मचारीही असतात याचाच प्रत्यय आज या मदतीमुळे पाहायला मिळाला एवढेच नव्हे तर कॉलनीमधील राहणाऱ्या नागरिकांनीही पाच हजाराची मदत जखमी महिलेच्या पतीला करून दिली. त्याची माहिती रविकांत तुपकर शेतकरी नेते हे वाईस ऑफ मीडियाच्या कार्यक्रमासाठी आले असता मुल इथून निघताना त्यांना याची माहिती कळतच त्यांनी किशोर डुकरे यांची भेट घेत मदतीचे आश्वासन दिले.
तसेच वरोरा येथील आगमनाप्रसंगी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक आणि संवेदनशील पणे काम करणारे किशोर डुकरे आणि शेतकरी पुत्रांनी उत्साहात शेतकरी नेते तुपकर यांचे स्वागत केले किशोर डुकरे व त्यांच्या सहकाऱ्यांची सोयाबीन कापूस धान उत्पादकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चाही करण्यात आली या भागातील सर्व प्रश्न समजून घेतले व त्यांच्या प्रश्नावर उभारण्यात येणाऱ्या लढत ताकदीने सोबत राहण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली या सर्वतोपरी मिळणाऱ्या मदतीमुळे जखमी महिलेचे जीवन प्रकृतीत सुधारणा होत असून बारा दिवसानंतर थोडीफार हालचाल दिसून येत आहे, डोळे उघडणे असे प्रकार करीत असल्याचे तिच्या पतीने प्रतिनिधीशी बोलताना सांगितले