कारंजा-राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद तर्फे दिनांक 19 नोव्हेंबर रोजी ब्ल्यू चिप कॉमेंट व जुनिअर कॉलेज कारंजा येथे वाशिम जिल्हास्तरीय प्रकल्प सादरीकरण प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रदर्शन मध्ये जिल्ह्यातील 30 प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले,त्यामधून दोन प्रकल्प निवडून ते विभागीय स्तरावर पाठवण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक विजय भड यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना दिली . याबद्दल सविस्तर वृत्त असे की,
राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद तर्फे वाशिम जिल्हा स्तरीय प्रकल्प प्रदर्शनीच्या उद्घाटनिय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वाशिम जिल्हा समन्वयक एस.डी हटवार तर उद्घाटक म्हणून ब्ल्यू चिप कॉन्वेन्ट व जुनिअर कॉलेजच्या प्राचार्या एस. जी परळीकर तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे दिग्रस येथील सदस्य पी.एम डवले उपस्थित होते.
सदर जिल्हास्तरीय प्रकल्प सादरीकरण प्रदर्शनासाठी जिल्ह्यातून 30 प्रकल्पाची नोंदणी करण्यात आली होती. सर्व प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले, त्यामधून सर्वोत्कृष्ट दोन प्रकल्प निवडून ते विभागीय स्तरावर पाठविण्यात आले.
जे.सी हायस्कूल कारंजा येथील कु.अनुश्री मनोज ठाकरे व कु.श्रावणी राहुल देशमुख यांचा चेंज कॉज बाय फॉरेस्ट टुरिझम सेंटर देन अँड नाऊ तसेच एस.सी रेसिडेन्शिअल गव्हर्नमेंट स्कूल तुळजापूर तालुका मंगरूळ येथील अमन दंदे व सुमित डापसे यांचा रेडियम वापरून जनावरांचा जीव वाचवणे या दोन प्रकल्पाची निवड जिल्हास्तरावर झाल्यामुळे त्यांचे प्रकल्प विभागीय स्तरावर पाठवण्यात आले.
प्रकल्प सादरीकरण प्रदर्शनीचे परीक्षण पी.एम डवले व बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी येथील मुख्याध्यापक विजय भड यांनी केले. निवड झालेल्या सर्व विद्यार्थी बालवैज्ञानिकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.