चंद्रपूर दि 19: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्याग आणि बलिदानाचे संघर्षशील परंपरा यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.भारतीय स्वतंत्र युध्दात ऐतिहासिक कामगिरी बजावणारे अनेक कॉमरेड या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर लटकले .अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्य मिळवून दिले,परंतु देशात आजची परिस्थिती फारच बिकट आहे भांडवल दाराचे लाड पुरवून श्रमिक जनतेची लूट व शोषण करण्याचे महापाप या देशातील सत्ताधारी वर्गाने अविरतपणे सुरू ठेवून ,जाती धर्माच्या नावाने राजकारण करत आहेत तेव्हा कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कसून विरोध करावा व त्यासाठी गाव तिथे शाखा उभी करून आपली पक्ष संघटना मजबूत करावी असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्यामजी काळे यांनी येथे केले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा अधिवेशन कॉ.वसंतराव वानखेडे सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाचे मार्गदर्शक कॉ.श्यामजी काळे त्याप्रसंगी ते बोलत होते.
शेतकरी शेतमजूर असंघटित कामगार औद्योगिक कामगार व समाजातील सर्वच घटकांचे जीवन मरणाचे प्रश्न तीव्र झाले असून त्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष देणे ऐवजी जाती धर्माच्या नावाने सत्ताधारी व सत्ताधारी वर्ग श्रमिका मध्ये उभा करण्याचे काम करत आहेत असे कॉ.डॉ महेश कोपुलवार म्हणाले.
अधिवेशनाची सुरुवात कॉ.एन टी म्हस्के कामगार नेते यांच्या हस्ते झेंडा वंदन करून करण्यात आली त्यानंतर प्रास्ताविक कॉ.रवींद्र उमाटे यांनी केले तर जिल्हा अधिवेशनाचे अध्यक्ष मंडळात कॉ.वनिता कुंठावार कॉ एन टी म्हस्के व कॉ.निकिता नीर हे होते.
गेल्या तीन वर्षाच्या कामकाजाचा अहवाल जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी मांडला त्यावर उपस्थित 14 प्रतिनिधींनी चर्चा केली व शेवटी हा अहवाल मंजूर करण्यात आला.
जिल्हा अधिवेशनात काही महत्त्वाचे ठराव करण्यात आले.
1) जबरान ज्योतधारकांना जमिनीचे पट्टे वाटप करा.गैर आदिवासी करिता असलेली तीन पिढीची अट रद्द करा.
2) स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे शेतकऱ्यांना किमान हमीभाव द्या.
3) शेतमजुरांसाठी केंद्रीय कायदा करा मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या रोहयो मजुरांना वर्षातून दोनशे दिवस काम द्या व किमान 700 रुपये दैनिक वेतन द्या .
4 )योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करून शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या.
5)सर्व कामगार कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या 9 जुलैचा देशव्यापी भारत बंद यशस्वी करा.
6) घरकुलाची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा .
7) जन सुरक्षा विधेयकाला विरोध करा.
8)जनतेला लुटणारी स्मार्ट प्रीपेड वीज मीटर लावण्यात येऊ नये व वाढविलेले विजेचे दर कमी करण्यात यावेत आदी ठराव यावेळी करण्यात आले.
आगामी तीन वर्षासाठी 35 जणांच्या जिल्हा कौन्सिल ची निवड करण्यात आली. या मध्ये कॉम्रेड रवींद्र उमाटे यांची भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा सचिव पदी तर सहसचिव म्हणून कॉ.विनोद झोडगे पाटील, कॉ.राजू गईनवार आणि कोषाध्यक्ष म्हणून कॉ.प्रकाश रेड्डी यांची निवड करण्यात आली.
22 ते 24 जून रोजी
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य
अधिवेशन नाशिक येथे आयोजित केले आहे यामध्ये जिल्ह्यातून 3 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत अशी माहिती जिल्हा सचिव रवींद्र उमाटे यांनी दिली आहे.
अधिवेशन करिता जिल्हाभरातील 85 पक्ष सभासद उपस्थित होते.
(कॉम्रेड विनोद झोडगे पाटील )
जिल्हा सह सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष
आपल्या प्रतिक्रिया द्या....