कारंजा : श्रीक्षेत्र कोंडोलीचे भूमिपुत्र अमोलभाऊ पाटणकर (मा.मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी ओएसडी) यांचा वाढदिवस कारंजा तालुक्यामध्ये व शहरांमध्ये विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. वाशिम जिल्ह्यातील जनतेच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करणारे अधिकारी म्हणजे अमोलभाऊ पाटणकर, शासनात मिळालेल्या पदाचा उपयोग केवळ लोकसेवेच्या कार्यासाठी करण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि कार्यशैली वाखण्याजोगी आहे.कारंजा येथे अमोल भाऊ पाटणकर मित्र मंडळातर्फे दिव्यांग विद्यालय, मूकबधिर विद्यालय,मतिमंद विद्यालय तसेच वृद्धाश्रम येथे फळ वाटप करण्यात आले, यावेळी अतुलभाऊ गुल्हाने, अंकुश कडू,सुनील फुलारी, नरेंद्र गाढवे,चेतन गावंडे,धाडवे सर,हरणे सर,प्रशांत बिजवे,बाबुरावजी सरोदे,संदीप गुल्हाने,किरण क्षार,राजेश बारडे,नितीन गढवाले,मनोज गोपने,संदीप गढवाले,गजाननराव जाधव,विनय गुल्हाने,किशोर पाठे,ओम गुल्हाने,सुनील दहापुते,गजानन गुल्हाने,वैभव जीरापुरे,गौरव गुल्हाने,हे सर्व उपस्थित होते.
पोहा येथे वाढदिवसानिमित्त दूग्धअभिषेक. 
पोहा येथे अमोलभाऊ पाटणकर यांच्या वाढदिवसानिम मुदगलेश्वर महादेव देवस्थान येथे सुनील भाऊ मसने यांच्या हस्ते दुग्धाअभिषेक करण्यात आला.यावेळी सुनील मसने गजानन ढोकने,गोपाल शेंडोकार,केशव जाधव,उल्हास अटक,मयूर कान्हे तसेच बाबाराव भटजी महाराज उपस्थित होते.
अमोलजी पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त कारंजा येथे मॅरेथॉन संपन्न
३७२ खेळाडूंचा सहभाग
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे (OSD) अमोलजी पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त कारंजा येथे श्री प्रकाशदादा डहाके वन पर्यटन केंद्रामध्ये मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी कारंजा तालुक्याचे तहसीलदार कुणाल झाल्टे व कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे तसेच कारंजा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष शार्दुलजी डोणगावकर कारंजा येथील मॅरेथॉनचे शिल्पकार डॉ.अजय कांत यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉन दौड सुरु करण्यात आली.मॅरेथॉनचे प्रास्ताविक व संचलन पराग गुल्हाने सर तर आभार प्रदर्शन डॉ.राम गुंजाटे यांनी केले.यावेळी अगदी बच्चे कंपनी पासून तर तरुण वयोवृद्ध देखील मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.मॅरेथॉन दोन टप्प्यांमध्ये आयोजित केली होती.महिला ३ कि.मी.व पुरुष ५ कि.मी. अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पाडण्यात आली.
यावेळी सर्वच उपस्थितांनी अमोल पाटणकर यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या या अनमोल कार्यामुळे तळागाळातील दिनदुबळ्या लोकांचे अगदी कामे सहजपणे होत असल्याचे म्हटले आहे.मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आपल्याला पाटणकर साहेबाकडे सहज तऱ्हेने जाता येते.एवढा मोठा अधिकारी असून देखील सुद्धा ते आपल्याला सहजपणे उपलब्ध होतात.व हीच त्यांची खास शैली आहे.विशेष म्हणजे सर्वधर्मसमभाव या तत्त्वावर चालणारे कार्यतत्पर, हजरजवाबी व विश्वासू असलेले ते पहिले आदर्श अधिकारी ठरले असल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी सांगीतले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....