नागभिड: पवित्र दीक्षाभूमी नागपूर येथे आॅडिटोरियम येथे जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ प्रेमकुमार बारीकराव खोब्रागडे यांच्या "आंबेडकरवादी चळवळीतील समता सैनिक दलाचे योगदान" या संशोधनपर ग्रंथास "कर्मवीर दादासाहेब गायकवाड उत्कृष्ट राष्ट्रीय ग्रंथ लेखन पुरस्कार" प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांचा भन्ते नागार्जुन सुरई ससाई यांचे हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रा. दीपककुमार खोब्रागडे, उद्घाटक जगप्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. सुमा रोडनवार प्रसिद्ध साहित्यिक कर्नाटक व अनेक साहित्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. डॉ प्रेमकुमार बारिकराव खोब्रागडे यांचे जन्मगाव नागभिड तालुक्यातील पळसगाव(खुर्द)हे एक छोटस गाव असुन नाट्यलेखक म्हणून झाडीपट्टीत त्याचा नावलैकिक आहे. यांना त्यांच्या संशोधनपर ग्रंथासाठी मिळालेल्या पुरस्काराबद्दल साहित्य क्षेत्रातील मान्यवर व आप्तेष्ट आणि मित्रपरिवार अभिनंदन करीत आहे.