विदर्भस्तरीय टॅलेंट हंट शो विदर्भातील, अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशिम, गोंदिया, चंद्रपूर, नागपुर या जिल्ह्यांमध्ये टॅलेंट हंटशो चे ऑडिशन विविध तारखांना झाले असून गडचिरोली जिल्ह्याचे ऑडिशन 2 जून2022 स्टार डान्स स्टुडिओ तिरुपती एसबीआय चंद्रपूर रोड गडचिरोली येथे सकाळी 11ते सायंकाळी 5 वाजता पर्यंत या दरम्यान होणार असून या ऑडिशन नंतर सेमी फायनल 5 जून नागपूर येथे होत असून फायनल 12 जूनला नागपूरला होणार आहे.यानंतरची नॅशनल लेवल ची स्पर्धा ही गोव्याला होणार आहे. या स्पर्धे अंतर्गत नृत्य, गायन, वादन व आपल्या अंगी असलेल्या इतर कलांचे सादरीकरण या ऑडिशनच्या दरम्यान करायचे असून विविध टप्प्याटप्प्यांनी ही स्पर्धा होणार असून,पूर्वी विदर्भस्तरीय ऑडिशन त्यानंतर महाराष्ट्र लेव्हलचे ऑडिशन व त्यानंतर व त्यानंतर राष्ट्रीय टॅलेंट हंट स्पर्धा गोवा येथे होणार आहे. 12 जून च्या सेमीफायनल राउंड मध्ये विजेत्या स्पर्धकांना महिंद्रा कंपनी कडून गोवा टूर पॅकेज तसेच सहभागी स्पर्धकांना विविध प्रमाणपत्रे व विविध बक्षिसे सुद्धा या स्पर्धेअंतर्गत मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये नृत्यस्पर्धा ,समूह नृत्य स्पर्धा, गीत गायन, पारंपरिक नृत्य स्पर्धा, लोकनृत्य स्पर्धा, अशा विविध स्पर्धा होणार असून, गडचिरोली जिल्ह्याचे कॉर्डिनेटर म्हणून गुरुकृपा कथक कला केंद्राच्या संयोजिका प्रेरणा गारोदे म्हणून यांच्याकडे कामगिरी दिली गेली आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी आपले नाव नोंदवून याकरिता विदर्भ टॅलेंट हंट शो गडचिरोली जिल्हा कॉर्डिनेटर प्रेरणा गारोदे मोबाईल नंबर 94 03344034 या क्रमांकावर संपर्क साधावा.तसेच रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असून सुरुवातीला रजिस्टेशन करण्याचे आवाहन प्रेरणा गारोदे यांनी केले आहे.