कारंजा (जिल्हा प्रातिनिधी संजय कडोळे) राधाताई मुरकुटे यांना समाजसेवेची आवड असून त्या स्थानिक केशव गुरुकुलच्या संचालिका आहेत. महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार,आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला आहे शिवाय सावित्रीबाई फुले पुरस्कार सोलापूर इत्यादी अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले असुन त्या सातत्याने सामाजिक कार्यात सहभागी होऊन सहकार्य करतात.
पाणी फाऊंडेशनचे कार्य, वृक्षारोपण बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले कार्य करतात त्यामुळे नुकतीच त्यांच्या विविधांगी सामाजिक कार्याची दखल घेऊन स्त्री शक्ती मंच संघटनेच्या मुख्य कार्यकारी संस्थापक अध्यक्षा सौ शारदा अतुल भुयार कारंजा यांनी , स्त्री शक्ती मंच संघटनेच्या तालुका महिला संघटिका पदी त्यांची निवड केली.
संपूर्ण महाराष्ट्रात स्त्री शक्ती मंच संघटनेच्या सव्वीस जिल्ह्यातील महिलाची नोंदणी झाली असून प्रत्येक जिल्हयातील महिला अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत हे विशेष.
स्त्री शक्ती मंच संघटनेचा उद्देश तळागाळातील गोरगरीब महिलांना शासकीय योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा आहे. स्त्री शक्ती मंच संघटनेच्या वतीने खेडयापासुन तर शहरापर्यंत शासकीय योजना प्रत्येक महिलेपर्यंत देऊन सक्षमीकरण,कार्यशाळा प्रशिक्षण मार्गदर्शन, उद्योग देऊन सक्षम आत्मनिर्भर करणे.यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचे सौ शारदा अतुल भुयार यांनी, महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचेशी बोलतांना सांगितले आहे.तरी जास्तीत जास्त महिलांनी राधाताई मुरकुटे यांच्याशी संपर्क साधून महिला सक्षमीकरणा करीता पुढे येण्याचे आवाहन सौ शारदा भुयार यांनी केले आहे.