कारंजा : मातृशक्ति उपासकांचे शक्तिपिठ असलेल्या करंजपुर निवासीनी श्री कामाक्षा मातेच्या, ऐतिहासिक वैभवशाली कारंजा नगरीमधून, श्री नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीला आज गुरुवारी ठिक १२ : ३० पासून प्रारंभ झाला असून, शहर पोलिस स्टेशन लगत असलेल्या कारंजा नगरीतील नामांकित महाराणा प्रताप व्यायाम शाळेच्या महाराणा प्रताप नवदुर्गोत्सव मंडळाची मिरवणूक सुद्धा सुरु झालेली आहे . सदरहु मिरवणुकीमध्ये शेकडो आबाल वृद्धांसह तरुण तरुणींचा सहभाग दिसत आहे . मनमोहक असे दांडीया नृत्य तरुणी सादर करीत असल्याचे दृश्य महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा शांतता समितीचे सदस्य संजय कडोळे यांनी टिपले आहे. त्यासोबतच शहरातील सर्वच नवदुर्गा मंडळाच्या नवदुर्गा प्रमुख विसर्जन मार्गावर शिस्तबद्ध पद्धतीने एकमागोमाग एक लागत आहेत . यावेळी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आधारसिह सोनोने यांनी पोलीस अधिकारी,राखीव पोलीस, गृहरक्षक दला द्वारे चोख बंदोबस्त ठेवल्याचे दिसून येत असून, शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यासह शांतता समितीचे सदस्य मोठ्या प्रमाणात सहकार्य देत असल्याचे दिसून येत आहे . तसेच विविध मंडळ, व्यापारी बंधू आणि समाजसेवी कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पिण्याचे पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था केलेली असल्याचे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे .