छत्तीसगड राज्यातील गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत एका. चकमकीत नक्षलवादी मनोज उर्फ बालकृष्ण याच्यासह १० नक्षलवाद्यांना ठार केल्याची माहिती मिळत आहे.. ही कारवाई सुरक्षा दलांसाठी मोठी यशस्वी ठरली आहे.
शोभा आणि मैनपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात सुरक्षा दलांनी हे ऑपरेशन राबवले. सध्या ही चकमक अद्याप सुरू असून, रायपूर रेंजचे आयजी अमरेश मिश्रा यांनी सांगितले की, सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात थांबून-थांबून गोळीबार सुरू आहे. आणखी काही नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या चकमकीत बालकृष्ण उर्फ बालन्ना उर्फ रामचंद्र उर्फ राजेंद्र उर्फ गोलकोंडा राजेंद्र उर्फ चिन्नी उर्फ मनोज याला ठार करण्यात आले आहे. ५८ वर्षीय बालकृष्ण हा तेलंगाना येथील वारंगल जिल्ह्याचा रहिवासी होता.अशी माहिती समोर येत आहे .