पुणे. दि. पुणे शहर मध्यवर्ती भागातील २१५ कसबा विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीतील शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर निवडणूक लढवित असून त्यांना विजय करण्यासाठी बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ २१५ कसबा विधान मतदार संघात बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कसबा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा घरोघरी जाऊन प्रचार करीत मतदारांशी भेटीगाठी घेऊन व चर्चा करून आपले अमूल्य मत देऊन रविंद्र धंगेकर यांचा विजय निश्चित करून कसबा विधानसभा मतदार संघात नागरिक आणि मतदार यावेळी परिवर्तन घडविणार असे बहुजन जनता दलाचे पंडितभाऊ दाभाडे यांनी सांगितले आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ पुणे शहरातील आप्पा बळवंत चौक येथील रवींद्र धंगेकर यांच्या मुख्य प्रचार कार्यालयात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस . काँग्रेस पार्टी . बहुजन जनता दल आणि महाविकास आघाडीतील समविचारी पक्षांच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या झालेल्या मेळाव्यात बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे हे बोलत होते
. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना काँग्रेस पक्ष बहुजन जनता दल व महाविकास आघाडीतील समविचारी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते