कारंजा : कारंजा ते मंगरूळनाथ मार्गावरील,श्री चवऱ्या महादेवाचे एकमेव असे जागृत संस्थान म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या ग्राम : शेलुवाडा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री महाशिवरात्री महोत्सवा निमित्त,श्री चवऱ्या महादेव संस्थान आणि शेलुवाडा येथील सर्वधर्मिय गावकरी मंडळीच्या अथक सहकार्यातून दि. १२ फेब्रुवारी २०२३ ते दि . १९ फेब्रुवारी २०२३ पर्यत,भव्य यात्रोत्सवाचे आयोजन आणि पंचक्रोशित प्रथमच, शिवपुराण वाचक तथा श्रीमदभागवताचार्य पंडीत जयप्रकाशजी महाराज अमरावती यांच्या सुमधूर वाणीतून,संगीतमय शिवपुराण कथा ज्ञानयज्ञ अखंड नामसप्ताह आयोजीत करण्यात आलेला

असून पंडीत जयप्रकाशजी महाराजाना संगीत साथ संगत सुप्रसिद्ध संगीतकार मुरलिधर ताथोड कारंजा, तबलावादक गणेश महाराज तडसे करणार असून, सर्वप्रथम शिवपुराण सप्ताहाचे उद्घाटन व शिवपुराण ग्रंथपूजन हभप रामदास महाराज मस्के पुजारी, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय पाटील तुरक , शिवभक्त डॉ.ज्ञानेश्वर गरड,शिवसेना नेते अनिल राठोड, ज्येष्ठ समाज प्रबोधनकार तथा पत्रकार संजय कडोळे, दारुबंदी चळवळीतील कार्यकर्ते दिलीप गिल्डा, रोमिल लाठीया, ज्ञानेश्वर गीते, सरपंच निलकंठ कांबळे, डॉ. इम्तियाज लुलानिया, उमेश अनासाने, सुनिल गुंठेवार, हाफिजखान , विजय राठोड, अमोल मोडक, योगेश जयस्वाल, श्रीमती पार्वताबाई शिंदे, रामदास कांबळे, राहुल सावंत, शिवाजीराव गायकवाड, सुनिल काटकर, दादाराव सोनिवाळ, नंदकिशोर कव्हळकर, गोपाल काकडे, प्रल्हाद मस्के यांच्या उपस्थितीत होणार आहे.

सप्ताहात दररोज सकाळी ०५:०० ते ०६ : ०० काकडआरती, संगीतमय शिवपुराण कथा दुपारी ०१:०० ते ०५:०० पर्यंत ; सायंकाळी ०६:०० ते ०७:०० हभप किसनलाल महाराज काळे व हरिपाठ मंडळाचा हरिपाठ राहणार असून सप्ताहात दररोज रात्री ०८:०० वाजता, अनुक्रमे जय भोले मंडळ म्हसनी, शंभूशेष महाराज मंडळ गिंभा, जय भोले मंडळ पारवा भवानी, जय भोले मंडळ सोहोळ, किर्तनकार हभप दौलत महाराज चव्हाण खोलापूर नेर यांचे किर्तन, जय भोले मंडळ गायवळ, शेलूवाडा तसेच आदर्श जयभारत संगीत परिवाराकडून "एक शाम महादेव के नाम"इत्यादी आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमाची मेजवानी असणार असून, सप्ताहात शेलुवाडा येथील गावकरी कृष्णराव मोडक, पांडूरंग डोके, रामेश्वर मस्के, निलेश डाखोरे, प्रल्हाद शिंदे, बबनराव मस्के, प्रल्हाद मस्के, समाधान नेतनकर, दत्तात्रय जिरे, संतोष डोके, उमेश सोनटक्के, रामदास मस्के, नंदकिशोर मोडक, तुकाराम मोडक, डॉ. ज्ञानेश्वर गरड इत्यादी शिवभक्तमंडळी अन्नदान करणार आहेत.

रविवार दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ०८:०० ते १२:०० वाजेपर्यंत नगर परिक्रमा,श्री शिवपुराण ग्रंथ दिंडी, जय भोले मंडळ शेलुवाडा, गायवळ, खडी ( धामणी ), शहा, जय गजानन महाराज भजनी मंडळ गायवळ, पोहा, आखतवडा इ .भजनी दिंड्याची भव्य मिरवणूक होणार असून दुपारी ०१:०० वाजता,मानोली येथील हभप श्रीराम महाराज राऊत मानोलीकर यांचे दहीकाल्याचे किर्तन व दुपारी ०२ : ०० वाजता, पुरणपोळीच्या मिष्टान्नाचा भव्य महाप्रसाद होणार आहे तरी यात्रेनिमित्ताने भाविक शिवभक्त वारकरी मंडळीच्या सहभागासह कारंजा येथील लघुव्यवसायिकांनी आपली छोटी मोठी दुकाने प्रतिष्ठाने यात्रेत थाटून यात्रेची शोभा वाढविण्याचे आवाहन शेलुवाडा ग्राम वासियांनी केले आहे. असे वृत्त संस्थानच्या वतीने संस्थानचे सेवाधारी शिवभक्त डॉ ज्ञानेश्वर गरड यांनी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....