वाशिम : जिल्ह्यातील कारंजा-मानोरा-मंगरूळनाथच्या तिन्ही तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी भयंकर वादळ, मुसळधार पाऊस व गारपिटीचा तडाखा गुरुवारी सुद्धा बसल्याचे त्यामुळे नागरीकांचे मोठे हाल झाल्याचे दिसून आले आहे. अनेकांच्या घरांची पडझड झालेली असून, झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. मंगरूळनाथ येथील प्रतिनिधी राजाराम राऊत यांच्या वृत्तानुसार,मंगरूळनाथ शहरात सायंकाळी पाच वाजता अर्धा तास दोनशे ग्रॅम वजनाची लिंबाच्या आकाराची गार पडली तर त्याच तालुक्यातील ग्रामिण भागात, वनोजा शेलूबाजार परिसरात, मानोरा तालुक्यात कोंडोली येथील प्रतिनिधी गजानन घुबडे, सागर कोटलवार यांचे वृत्तानुसार कोंडोली येथे लिंबासारखी गार पडली.
त्यामुळे कांदा, टमाटर, उन्हाळी मुगाचे भयंकर नुकसान झाले आहे.गव्हा,आसोला, कारखेडा भागात अंदाजे दोनशे ग्रॅम वजनाची गार पडल्याचे वृत्त आहे. तर आमचे प्रतिनिधी डॉ कलिम मिर्झा यांच्या माहितीनुसार इंझोरी येथील गुरुवारच्या आठवडी बाजारात आलेल्या व्यापारी, ग्रामस्थांना सुसाट वार्यामुळे व पावसामुळे बाजारात आलेल्या व्यापारी वर्गाचे हाल झाले आहेत. असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना प्राप्त झाल्याचे त्यांनी कळविले आहे.