कारंजा (लाड) : प्रत्यक्ष परमेश्वराने सृष्टी निर्माण करतांना कोणताही भेदाभेद न ठेवता स्त्री पुरुषाशिवाय तृतियपंथी म्हणजेच किन्नर जमातही जन्माला घातलेली आहे.इतिहासात देखील रामायण महाभारत काळात किन्नरांचा उल्लेख अधोरेखित केलेला असून महाराष्ट्रियन लोकनाट्यामध्ये (तमाशा लोककलेमध्ये) किन्नराची भूमिका हमखास रहात असे. विशेष करून किन्नर समाजाला उपजत असे मानवी कल्याणाचे कार्य सुद्धा सोपवीलेले आहे.त्यामुळे लग्नप्रसंगी किंवा बाळ जन्माला आल्यानंतर किन्नर त्या ठिकाणी उपस्थिती लावून उभयतांना आपले आशिर्वचन देत असतात.अंधश्रद्धेचा भाग बाजूला ठेवा परंतु एखाद्या महत्वाच्या कार्यासाठी जात असतांना किन्नर दृष्टिस पडल्यास शुभ संकेत असल्याचे मानले जाते.शक्यतो किन्नर सामुहिक मेळ्याने राहण्याला पसंती देतात. तर काही किन्नर एकाकी जीवन जगतात.समाजातील शिष्टमंडळी किन्नराशी मिळून मिसळून वागत नसल्याचे आणि जवळ येवू देत नसल्याचे शल्य किन्नरांना वाटत असते.मात्र आपले अतिव दुःख आणि वेदना काळजात लपवून किन्नर आपल्या चेहऱ्यावर आनंदाचे उसने अवसान आणून, हास्यमुखाने माया-ममता-प्रेम दर्शवीत नाच-गाणी करीत पोटाची खळगी भरण्यासाठी दान मागत असतात.त्यांचा उदरनिर्वाह सर्वाथाने आपल्यावरच अवलंबून असतो. परंतु अशा प्रकारे जीवन जगत असतांनाही कारंजा (लाड) येथील किन्नर श्रावणी हिंगासपूरे ही मुळातच हास्यमुख,प्रेमळ मायाळू व सेवाव्रती असल्यामुळे सातत्याने आपल्या उत्पन्नातून खारीचा वाटा समाजसेवेसाठी खर्च करीत असते.श्रावणी हिंगासपूरे शिवभक्त असल्यामुळे तीला सामाजिक कार्यासोबतच धार्मिक व आध्यात्म्यिक कार्याची आवड असून तीचे स्वतःचे महिला भजनी मंडळ देखील आहे.देशभक्तीपर कार्यक्रमासोबतच पालखी,पदयात्रा व सामाजिक कार्यात श्रावणी हिंगासपूरे ही सातत्याने सहभागी होऊन आपली सेवा प्रदान करते. शिवाय कारंजा येथील श्री.गणेशोत्सव श्री.दुर्गोत्सव विसर्जन मिरवणूकी मधील मंडळ कार्यकर्ते व हजारो भाविक दर्शक प्रेक्षकासाठी दरवर्षी श्रावणी हिंगासपूरे सकाळी ११:०० ते उशिरा रात्री १० : ०० वाजेपर्यंत उच्च प्रतिच्या अल्पोपहाराची व्यवस्था आणि मंडळाच्या अध्यक्ष/मंडळ प्रमुखांच्या मानपानाची (शेला/श्रीफळ देऊन सत्कार) व्यवस्था करते.श्रावणी हिंगासपूरे हिचा हा स्तुत्य उपक्रम मोठमोठ्या दानशूर धनिकांना आश्चर्यात पाडणारा आहे.एवढे मात्र निश्चित.त्यांच्या अशा स्तुत्य कार्यक्रमाची दखल घेवून हिंदु एकता मंडळ,मारवाडीपूरा कारंजा यांनी तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे अमरावती विभागीय अध्यक्ष सुनिलभाऊ फुलारी ऐतनगरकर यांच्या पुढाकारातून,त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याकरीता प्रजासत्ताक/स्वातंत्र्य दिनाला राष्ट्रध्वजाच्या ध्वजारोहणाचा सन्मान देखील प्राप्त करून दिला आहे. तसेच त्यांच्या समाज कल्याणाच्या सेवाभावी कार्याची दखल घेवून,महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने तीची नेमणूक,समाज कल्याण वाशिमचे सहाय्यक आयुक्त मारुती वाठ यांनी जिल्हास्तरिय तृतियपंथी हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ" ह्या समितीवर अशासकिय - सदस्य" म्हणून केली आहे.तसेच तिच्या गौरवास्पद सेवाव्रती कार्याची दखल घेऊन नुकतेच वैदर्भिय नाथ चॅरिटेबल ट्रस्ट कारंजाच्या अध्यक्ष सौ.पुनम पवार आणि संस्थापक सचिव एकनाथ पवार यांनी श्रावणी हिंगासपूरेला "महाराष्ट्र भूषण" हा राज्यस्तरिय पुरस्कार कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या आमदार श्रीमती सईताई डहाके, मुर्तिजापूर बार्शिटाकळी विधानसभा मतदार संघाचे आमदार हरिशजी पिंपळे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या विदर्भ विभागाचे उपाध्यक्ष संजय कडोळे,आदर्श समाजसेवक गिरीधारीलाल सारडा,तरुण क्रांती मंच वाशिमचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांचे हस्ते दिला आहे.त्यामुळे श्रावणी हिंगासपूरे यांचे स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे, सचिव विजय खंडार,उपाध्यक्ष उमेश अनासाने,कार्याध्यक्ष लोमेश पाटील चौधरी,कोषाध्यक्ष प्रदिप वानखडे,व्यवस्थापक शेषराव पाटील इंगोले, श्रीमती कांता लोखंडे,सौ सरला इंगोले,सौ इंदिरा मात्रे आदींच्या हस्ते सन्मानपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.