कारंजा लाड: हृदयरोगासारख्या धोकादायक आजारावर मात करणाऱ्या रुग्णांचा सन्मान करणारा “हृदयरोग विजय उत्सव” दिनांक ६ जुलै रोजी कारंजा लाड येथील माधवबाग क्लिनिकच्या वतीने पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. मनोज गिदवाणी अध्यक्ष, आयुर्वेदिक डॉक्टर्स असोसिएशन यांनी भूषवले.
वाशिम जिल्ह्यातील पहिले माधवबाग क्लिनिक हे डॉ. संगीता धांडे यांच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले.
या उपक्रमामागे नेत्रतज्ज्ञ डॉ. मिलिंद धांडे यांची दूरदृष्टी आणि ग्रामीण भागातील रुग्णांना आधुनिक उपचारांची सहज उपलब्धता हा उद्देश आहे.
धांडे कुटुंबीयांनी कारंजा लाड सारख्या तालुक्यात हे क्लिनिक सुरू करून अनेक रुग्णांना नवजीवन दिलं आहे.
या कार्यक्रमात हृदयरोगावर यशस्वी मात करणाऱ्या पाच रुग्णांना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ मनोज गिदवाणी , डॉ बाबाराव शिंदे,सामाजिक अभ्यासक योगेश यादव, सर्वधर्म मित्र मंडळाचे अध्यक्ष श्याम सवाई, डॉ. संगीता धांडे आणि डॉ. मिलिंद धांडे यांची उपस्थिती लाभली.
रुग्णांनी आपल्या अनुभवातून नमूद केलं की "डॉ. संगीता धांडे या केवळ डॉक्टर नाहीत, तर त्या आमच्यासाठी एक मार्गदर्शक शिक्षिका आहेत. त्यांनी आमच्याशी घेतलेली आत्मीयता आणि मार्गदर्शनामुळेच आज आम्ही हृदयरोगावर मात करू शकलो."
अध्यक्ष डॉ. मनोज गिदवाणी यांनी आपल्या भाषणात सांगितले, "माधवबाग क्लिनिकचा हा उपक्रम म्हणजे ग्रामीण आरोग्य सेवेसाठी एक आदर्श मॉडेल आहे. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची जबाबदारी घेत, अशा क्लिनिकचा लाभ घेतला पाहिजे."
माधवबाग क्लिनिक कारंजा लाड हे अशा वैद्यकीय सेवा देणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे जिथे रुग्ण वेळेवर उपचार घेऊन कायमस्वरूपी आजारमुक्त होतात. असे वृत्त प्रा. अशोकराव उपाध्ये यांचेकडून मिळाल्याचे आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....