ब्रम्हपुरी येथील डॉ पंजाबराव देशमुख कॉन्व्हेन्ट ब्रम्हपुरी येथे डॉ पंजाबराव देशमुख माहिती व मार्गदर्शन केंद्र,ब्रम्हपुरी द्वारे शेतकरी कार्यशाळा घेण्यात आली यामध्ये पशुधन नष्ट झाल्यामुळें शेणखत फार कमी शेतकरी वापरतात व तुलनेने रासायनिक खतांचा वापर फार मोठा होत आहे.यामुळे पी एच बाधित झाला असून जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस कमी होत आहे व धानावरील रोगराई वाढल्या आहेत व यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक बजेट बिघडत आहे .भविष्यात आपली जमीन निकामि होनार आहेत
त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य असल्यास शेणखत,हिरवळीचे खत वापरावे व गरजेुसार थोडा रासायनिक खत वापरावा असे मौलिक विचार नागपूर येथील शेंद्रीय शेती तज्ञ श्री राजू पाटील गावंडे यांनी व्यक्त केले
याप्रसंगी डॉ पंजाबराव देशमुख माहिती व मार्गदर्शन केंद्र ब्रम्हपुरी चे अध्यक्ष प्रा प्रकाश बगमारे यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना शेतकरी बांधवांना शेंद्रीयखत व थोडे रासायनिक खत वापर करून निरोगी जमीन व निरोगी पीक हातात घ्यावे व औषध फवारणीचा खर्च कमी करून उन्नती साधावी व या केंद्राच्या माध्यमातून समाजकार्य करू असे मत व्यक्त केले
याप्रसंगी केशव करंबे, बोंडेगाव,दिनकरराव फटीग व नानाजी सेलोकर कुर्झा,डॉ शेळके समता कॉलोनी,अरविंद भूते मौशी,सुखदेव जी प्रधान जाणो वार्ड,सौरब धांदे नान्होरी,प्रकाश शेंडे सावलगाव,सरोज बगमारे चांदली,झिल्पे हनुमाननगर व अन्य शेतकरी यांनी सहभाग घेऊन आपले अनुभव कथन केले व श्री राजू पाटील गावंडे यांनी व्यक्त केलेल्या सूत्रानुसार कार्य करू असे आश्वासन दिले