कारंजा : हिंदुहृदयसम्राट,वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त,स्थानिक बाळासाहेबाची शिवसेना पक्षाचे वतीने, तालुका व शहर कार्यकारिणीकडून, स्थानिक बायपासस्थित कार्यालयात, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ नि:ष्पक्ष पत्रकार संजय कडोळे तथा सिंधी समाजाचे अध्यक्ष घनश्यामदासजी केसवानी यांचे शुभहस्ते, वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात येऊन अतिशय आनंदोत्साहात हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी सदरहु कार्यक्रमाला बाळासाहेबांची शिवसेनापक्षाचे उपजिल्हाप्रमुख मनोज पाटील दहातोंडे,कारंजा तालुका प्रमुख मंगेश पाटील मुंदे, कारंजा शहर प्रमुख अरुणभाऊ बिकड,महाराष्ट्र नवनिर्माण फाऊंडेशनचे अध्यक्ष अनुप पाटील ठाकरे कारंजाचे सर्व पदाधिकारी,कारंजा सिंधी समाजाचे अध्यक्ष घनश्यामदासजी केसवानी,नंदू तोरसे,शेखर पाटील,ओम नाईकवाल, गोपाल रक्ते,आशिष दस,अमित राठोड,बंटी घुले, हिमंत मोहकार,उपाध्ये पाटील, राजुभाऊ इंगळे इत्यादी शिवसैनिकाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. असे वृत पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.