ब्रम्हपुरी:- म.रा.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपुर यांचे अंतर्गत घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहिर असुन स्थानिक ख्रिस्तानंद स्कुल अँड ज्युनिअर काँलेज ब्रम्हपुरी चा निकाल १०० टक्के लागलेला आहे.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा विद्यालयाने कायम राखली आहे.
विद्यालयातुन स्नेहा यशवंत पंचभाई हिने ९७.४० टक्के गुण घेवुन विद्यालयातुन प्रथम येण्याचा मान मिळविला आहे तर सायली ओमप्रकाश निखारे हिने ९६.२०टक्के गुण घेवुन द्वितिय तर,आर्या संतोष दिवटे व सय्यामी पवन शिंगाडे ह्यांनी ९५ टक्के गुण घेवुन तृतिय येण्याचा मान मिळविला.त्यासोबतच रिद्धि दत्तात्रय टिकले ९४.६० टक्के, अमोघ सुरेश साखरकर ९४.४० टक्के,तनुश्री राजु सहारे ९४.२० टक्के,आर्या विलास भागडकर हिला ९४.०० टक्के गुण मिळाले.
ब्रम्हपुरी तालुक्यात इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देणारी ख्रिस्तानंद स्कुल अँड ज्युनिअर काँलेज ही सर्वात मोठी व जुनी शाळा आहे.नियमित होणारे वर्ग,शिस्तबद्धता, उच्चविद्याविभुषित शिक्षकवर्ग यामुळेच दरवर्षी दहावी व बाराविचा निकाल १०० टक्के लागतो. विद्यालयातुन १९० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली त्यात ९०टक्के च्या वरती ५२ विद्यार्थी,८० ते ९० टक्यांमध्ये ८० विद्यार्थी,७० ते ८० टक्यांमध्ये ३४ विद्यार्थी,तसेच ६० ते ७० टक्कांमध्ये २४ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विद्यालयाचे व्यवस्थापक फादर कुरीयन,मुख्याध्यापिका सिस्टर पावना, उपमुख्याध्यापिका सिस्टर जिन्सिटा,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी काैतुक केलेले आहे.