किसान विद्यालय चिकणी येथे गोकुळ अष्टमी निमित्य मुख्याध्यापक श्री संजय पिंपळशेंडे यांनी शाळेत दहीहंडी चा कार्यक्रम आयोजित करून विध्यार्थ्यामध्ये भारतीय संस्कृतीचे संवर्धन करण्याचे काम केले. पिंपळशेंडे मार्गदर्शन करतांना म्हणाले कि विद्यार्थ्यांमध्ये मुल्य रुजवायचे असेल तर या प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक शाळेत घेणे गरजेचे आहे. या कार्यक्रमात शाळेतील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्यात आली. नमन शिवशंकर मसाळकर कृष्ण तर ख़ुशी सुरेश खापणे यीने राधिकेची वेश भूषा धारण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. दही हंडी स्पर्ध्ये मध्ये वर्ग ९ वी ची कु. पुजा सुरेश भूरकुंडे हिने प्रथम क्रमांक मिळविला . वर्ग दहावीतील विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्यासाठी 5-3-1 असे थर लावून हंडी फोडून विद्यार्थ्यांमध्ये मनमोहक क्षण निर्माण केला.श्री. पिंपळशेंडे यांच्या स्व-इच्छे मुळे या शाळेत प्रथमच दहीहंडी चा कार्यक्रम साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व कर्मच्यार्यांनी प्रयत्न केले.