जिल्ह्यातल्या सिंदेवाही शहराजवळभयानक घटना घडली आहे. मधमाशांनी केलेल्या हल्ल्यामध्ये 40 जण जखमी झाले आहेत.ही सगळी माणसं अंत्ययात्रेसाठी स्मशानभूमीत आली होती, तेव्हाच पोळ्यावर असलेल्या मधमाशा स्मशानभूमीत शिरल्या. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाही शहरातले स्थानिक राजू मार्तंडवार यांचं निधन झालं. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक आणि जवळची मंडळी स्मशानभूमीत आली होती, तेव्हाच अचानक मधमाशांचा हल्ला झाला.
मधमाशा येत असल्याचं पाहून जमलेल्या नागरिकांनी प्रेत सोडून पळ काढला. मधमाशांच्या हल्ल्यामध्ये तब्बल 40 जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आलं आहे, यातल्या दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. परिस्थिती निवळल्यानंतर राजू मार्तंडवार यांच्यावर संध्याकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.