स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, भारतातील पहिल्या महिला मुख्याध्यापिका, कवयित्री, प्रबोधनकार, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ब्रम्हपुरी येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात तालुका महीला व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दि. 3 जानेवारी रोजी साजरी करण्यात आली. यावेळी प्रथमतः उपस्थित मान्यवर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी बोलतांना मान्यवर म्हणाले की, सावित्रीबाई फुले ह्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढल्या. त्यांनी सर्व जातीधर्माच्या मुला-मुलींना मोफत शिक्षण दिले. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी खुप प्रयत्न केले. विधवा पुनर्विवाहाला चालना दिली. बालविवाहाला प्रतिबंध केले. आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. स्त्री असल्याचा त्यांनी कधीही न्यूनगंड बाळगला नाही. सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व केले. जीवनात आलेल्या संकटांना न घाबरता त्यांनी त्यावर मात केली. असे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, माजी जि.प. सदस्या स्मिताताई पारधी, महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्षा मंगलाताई लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले, माजी जि.प. सदस्य डॉ राजेश कांबळे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, नगरसेविका सुनीताताई तिडके, नगरसेविका लताताई ठाकुर, नगरसेविका निलीमाताई सावरकर, नगरसेविका वनिताताई अलगदेवे, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद मोटघरे, माजी सरपंच राजेश पारधी, कृ.उ.बा.स. प्रशासक वामन मिसार, आवळगाव से.स.सं.सदस्य किशोर राऊत, माजी सरपंच संदीप सेलोकर, ब्रम्हदेव दिघोरे, सरपंच धीरजगोपाल धोंगडे, उपसरपंच संदीप बगमारे, सोमेश्वर उपासे, भास्कर सोनोने, अमोल सलामे, जयाताई कन्नाके, सुधाताई राऊत, मेश्राम ताई यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....