कारंजा : कारंजा येथील गोंधळी लोककलावंत, स्व.श्री.गोविंदराव उर्फ बंडू विष्णूपंत कडोळे.राहणार गोंधळीनगर कारंजा (लाड ) यांचे रविवारी संध्याकाळी दुर्धर आजाराने, दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी उद्या सोमवार दि ९ जानेवारी २०२३ होणार असून, त्यांचे निवासस्थान श्री कामाक्षा देवी मंदिर जवळून उद्या सकाळी ११ वाजता अंत्ययात्रा निघेल. त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या पाठीमागे पत्नी ज्योतीताई व दोन मुले अमोल व सागर कडोळे हे आहेत. श्री कामाक्षा देवी संस्थान कारंजा कडून अध्यक्ष हभप दिगंबरपंत महाजन सचिव रोहीत महाजन यांनी, आई श्री कामाक्षा मित्र परिवार तथा गोंधळी समाज संघटनेने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.