गाव खेड्यात संस्कृती जपताना आई-वडिल हे जरी खरे पालक असले तरी गुरुजींनी विद्यार्थ्यासोबत स्वतः पालक बनवून कार्य कले पाहिजे तरच गुरुजींचे खरे महत्त्व लोकांना कळेल शिवाय माझ्या जन्मभूमीतील खरकाडा गावात माझा सत्कार करण्यात आला तो माझ्यासाठी सर्वोच्च कार्याची पावती आहे असे भाऊक गौरवउद्गार निरुपा विद्यालयाचे मुख्याध्यापक अमर ठाकरे यांनी व्यक्त केले ते 10 सप्टेंबर रोजी खरकाडा येथील नवनिर्माण सार्वजनिक गणेश मंडळ च्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी सत्कारमूर्ती म्हणून बोलत होते
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विनोद दोनाडकर पत्रकार विशेष अतिथी म्हणून रुई येथील निरुपा विद्यालयाचे मडावी सर रुई येथील माजी सरपंच सुजित बालपांडे खरकाडा गावचे प्रतिष्ठित नागरिक तथा माजी सरपंच मुखरू पारधी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन अमर ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून मनोज मैन्द. सर्वेश्वर ठाकरे हिरालाल मेश्राम
राजेश्वर शिऊरकार लक्ष्मण मेश्राम (शिक्षक) नवनिर्माण गणेश मंडळाचे सचिव मच्छिंद्र शिऊरकर अध्यक्ष अमोल कुथे
युवराज कुथे सरपंच सत्यवान सहारे उपसरपंच ताराचंद पारधी ह भ प देवानंद ठाकरे तालुका किसान सेलचे अध्यक्ष नानाजी तुपट ग्रामपंचायत सदस्य प्रफुल ठाकरेआनंद शिऊरकार शालिक वाघधरे देवराव पारधी अशोक वाघधरे हरी ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम बघमारे यांनी केले तर आभार किशोर प्रधान यांनी मानले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नवनिर्माण गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले