वाशिम : महाराष्ट्र राज्यातील प्रत्यक्ष मराठा समाज हाच आजच्या घडीला आरक्षणाअभावी शैक्षणीक,सामाजिक, राजकिय,आर्थिक दृष्ट्या मागासलेला असल्याची जाणीव होऊन स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानंतर प्रथमच पूर्णतः जागा होऊन एकवटल्यामुळे, मराठा समाजाच्या प्रत्येक बांधवाला एकत्र जुळविण्याकरीता,आणि काहीही झाले तरी मराठा समाजाच्या मुलाबाळाकरीता आरक्षण मिळवून घेणारच हा संदेश प्रत्येक मराठ्याला देण्याकरीता, वर्तमान दशकातील झुंजार मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची विराट अशी जाहिर सभा वाशिम जिल्ह्यातील ग्राम काटा येथील, लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या भव्य प्रांगणावर, मंगळवार दि ५ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १२:०० वाजता आयोजीत करण्यात आलेली आहे. त्याकरीता वाशिम जिल्ह्यातील, ग्राम काटा येथील सकल मराठा समाजाने "न भुतो न भविष्यती" अशी तयारी करण्याचे ठरवीलेले असून,सदर विराट अशा जाहीर सभेकरीता आयोजन समितीच्या पस्तिस समित्या तयार करण्यात येवून,प्रत्येक समितीकडे जबाबदारी वाटून देण्यात येणार आहे. सदहू सभेच्या तयारीकरीता वाशिम जिल्ह्यात जिल्हास्तर, तालुकास्तर, जिल्हा परिषद मंडलस्तर व ग्रामस्तरावर विविध शहरे व खेडोपाडी बैठका सुरु असून, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला जिल्ह्यातून दहा बारा लाख समाज बांधवांचा विराट असा जनसमुदाय येण्याची शक्यता आहे. त्याकरीता जिल्हयातील मराठा समाजातील निवृत्त अधिकारी,शिक्षक,डॉक्टर, इंजिनिअर,आयटी तज्ञ,निवृत्त पोलीस अधिकारी,अँडव्होकेट, सी ए,पत्रकार इत्यादी मंडळीची यादी करण्यात येत असून, सभेकरिता योगदान व श्रमदान करणाऱ्या लोकांना आवाहन करण्यात येत आहे.मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या आंदोलनाने देशभरात उच्च पातळीवरील सामाजिक कार्यकर्ते,मराठा योद्धे म्हणून उदयास आल्यामुळे त्यांच्या सभेकरिता प्रचंड प्रमाणात गर्दी जमण्याची शक्यता असल्याचे वृत्त आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.