कारंजा शहरातील जूना बस स्टेण्ड परिसरातील श्रीमती सीतादेवी गोलेच्छा कोंवेट मध्ये दि.6 फेब्रु रोजी सांय.6 वाजता वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या वेळी शाळेतल्या विद्यार्थीनी विविध प्रकाराचे नृत्य सादर करुण मान्यवर व पालक वर्ग, प्रेक्षकाना मंत्रमुग्ध केले..या कार्यक्रमा चे अध्यक्ष गटशिक्षण अधिकारी श्रीकांत माने तर उद्घाटक प्रकाशचंद गोलेच्छा व संस्था अध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा प्रमुख अतिथि म्हणून पो.उप.नी अंभोरे मॅडम, प्राजक्ता माहीतकर,सविता काळे, नीता लांडे, शुभांगी रावले, शाळा संचालिका निशा गोलेच्छा,संस्था सचिव विनीत गोलेच्छा आदिची उपस्थिति होती,या वेळी गटशिक्षण अधिकारी माने यांनी शिक्षकाना मार्गदर्शन करताना त्यांनी अधिक परिश्रम करुण चाँगले उपक्रम आयोजित करावे असे सांगितले.
सोबतच विद्यार्थीयांना सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले,शाळेतील लहान लहान चिमूकल्यानी विविध नृत्य सादर करुण देशातिल एकता अबाधित राहन्यासाठी देशभक्ति चे नृत्य करुण उपस्थित पालक वर्ग अतिथि मान्यवराना मंत्र मुग्ध केले. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका सरिता राठोड,अर्पिता कुरहे , मोहिनी मुंदे, सुषमा कटके, छाया बेद्रे , वैशाली राउत, स्वाती खोड़े, वैशाली परकोटे, रुपाली बोळे, कुलश्री सावजी, ममता चव्हान , राजकुमारी अहेरवार, सुरेश गोहर, शिक्षक हृषिकेश रुनवाल आदिनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्तविक नरेन्द्रजी गोलेच्छा यांनी व तर आभार निशा गोलेच्छा यांनी मानले.
सूत्रसंचालन शिक्षिका शीतल ठाकरे यांनी केले.
कार्यक्रमात मोठ्या संख्येनें पालक वर्ग उपस्थित होते..