आरमोरी:-
जनतेच्या समस्या तात्काळ निकाली काढण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेणार असून जनता दरबारातच समस्या निकाली काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री माननीय नामदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केली.
आरमोरी येथे माजी आमदार हरिरामजी वरखडे यांच्या निवासस्थानी आयोजीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार हरीरामजी वरखडे, रा. का. पा. जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी कृषी सभापती नानाभाऊ नाकाडे, रा.यु.का. चे जिल्हा अध्यक्ष लिलाधर भरडकर, मोहिनी वरखडे, युनूस शेख, रा.यु.का. माजी जिल्हा अध्यक्ष किशोर तलमले, प्रा. ऋषीकांत पापडकर, जिहा सरचिटणीस शैलेश पोटूवार, जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष आरिफ पटेल, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटवानी, योगेश नांदगाये, तालुका अध्यक्ष अमीन लालानी, तालुका कार्यकारी अध्यक्ष सुनील नंदनवार, वडसा तालुका अध्यक्ष संजय साळवे, शहर कार्याध्यक्ष प्रदीप हजारे , कुरखेडा तालुका अध्यक्ष राम लांजेवार, टेटू पाटिल नाकाडे, अयुबभाई शेख, हंसराज लांडगे, वडसा शहर अध्यक्ष लतिफभाई शेख, कपिल बागडे, सुरेंद्र बावनकर, धुरंदर सातपुते, अनिल अलबनकर, दिवाकर गराडे, राजू आकरे, देवानंद बोरकर, प्रफुल्ल राचमलवार, नरेश ढोरे, रवि दुमाने, उदाराम दिघोरे, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी भविष्यात दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असणारे दोन मोठे सिमेंट कारखान्याचे उद्योग जिल्ह्यात येणार असून त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
२०२४ मध्ये महायुतीचेच सरकार येणार असून त्यासाठी राष्ट्रवादी काँगेस च्या कार्यकर्त्यांनी बूथ कमेट्या मजबूत करण्याचे काम हाती घ्यावे. असे आवाहन ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
ना. आत्राम यांचे आरमोरी नगरात आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजीने व लेझिम नृत्य पथकाने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन बंडू रोहनकर यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....