"शासनाने अवकाळी पावसाने बाधीत शेत पिकांची त्वरीत पाहणी करून,नुकसानग्रस्ताना अविलंब सरसकट अर्थसहाय्य देण्याची मागणी." अकोला/वाशिम*: गेल्या दोन दिवसां पासून सतत गारपिटी सह किंवा धुवाँधार सुरु असलेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यासह,मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम, अमरावती,यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे (तुर,कपाशी), भाजीपाला,मिरची,टोमॅटो, फळबागा इ.चे प्रचंड नुकसान झाले आहे.त्यामुळे शासनाने संबधीत कृषी अधिकारी,मंडल अधिकारी,तलाठी,ग्रामसचिव यांचेमार्फत अवकाळी पाऊसाने नुकसानग्रस्त झालेल्या पिकांचे त्वरीत पंचनामे करून,शेतकऱ्यांना सरसकट अर्थसहाय्य तसेच पिकविम्याची रक्कम देण्याची मागणी संबधीत शेतकर्याकडून होत आहे. अकोला जिल्ह्यातील कुरणखेड, बोरगाव मंजू,पळसो बढे भागात देखील अवकाळी पावसाने तुरपिके शेतातच झोपली असून, तुरीचा बार ( फुलोर ) गळून पडला आहे. यासंदर्भात तानखेड शेतशिवार येथील वयोवृद्ध अल्पभूधारक शेतकरी रामदास वाकोडे यांनी आपल्या तिन एक्कर तुरपिकाचे प्रचंड नुकसान झाले असल्याची माहिती देत, शासनाने त्वरीत पिकविम्याची नुकसान भरपाई देण्याची मागणी लावून धरली आहे.ऐन हिवाळ्यात आलेला हा पाऊस आपल्या सोबत कमालीचा गारठा घेऊन आलेला आहे. त्यामुळे त्याचा मानवी आरोग्यावरही प्रचंड परिणाम होऊन, सर्दि, ताप, डोकेदुखी आजारांनी डोके बाहेर काढलेले आहे. त्यामुळे खाजगी दवाखाने प्राथमिक केन्द्रामध्ये रुग्नांची गर्दी वाढत आहे.तरी शासनाने मदतीचा हात देणे जरूरी असल्याची मागणी होत आहे वाशिम,यवतमाळ जिल्ह्यात कपाशी, तुर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर गहू हरभरा पिके सुद्धा खराब झाली आहेत.