वाशिम: जिल्ह्यातील तत्कालिन पालकमंत्र्यानी सन 2019 ते 2024 पर्यंत पाच वर्षे स्वतःच्या राजकारणा करीता जिल्ह्यात कोणत्याही शासकिय निमशासकिय समित्याचे पुनर्गठन न करता,ऐन विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर मात्र राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यीक कलाकार योजनेच्या लाभार्थ्याकरीता "जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समिती" स्थापन करून विधानसभा आचार संहितेपूर्वी ऑक्टोंबर 2024 मध्ये, जिल्ह्यातील वृद्ध लोककलावंताकडून सादरीकरण करून घेतले होते. व जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समितीतील अध्यक्ष पंकजपाल राठोड व सदस्यांची वार्षिक बैठक घेतलेली होती.मात्र सदर बैठकीमध्ये त्यांनी कोणत्या कलाकारांना मानधन मंजूर केले ? किती कलाकारांना मानधन मंजूर झाले ? त्यामध्ये सच्चे कलाकार किती आहेत ? पारंपारिक लोककलावंत किती आहेत ? हे मात्र गुलदस्त्यात आहे. त्यामुळे सादरीकरणास हजर राहून प्रात्याक्षिक झालेले कलाकार मानधन मिळण्याची अपेक्षा करीत असून आपल्या नावाला समितीकडून मंजूरी मिळाली काय ? ह्या अपेक्षेने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात येरझारा मारीत आहेत. परंतु काहीतरी थातुर मातुर उत्तर देवून अद्याप यादी बनवायची आहे असे उलट सुलट सांगून त्यांची बोळवण केल्या जात आहे.आपण स्वतंत्र लोकशाहीत जगत असतांना निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी का प्रसिद्ध होत नाही ? सदर लाभार्थ्यांची संख्या व नावे का जाहीर केल्या जात नाही. असा प्रश्न कलावंताना पडलेला असून याप्रकरणी लवकर कार्यवाही होऊन,अध्यक्ष पंकजपाल राठोड व निमशासकिय सदस्य पदाधिकार्याच्या समितीने मंजूर केलेली लाभार्थ्याची यादी जाहीर न झाल्यास लवकरच विराट धरणे आंदोलन करण्याचा लोककलाकारांचा मानस आहे व तशा आशयाचे निवेदन विदर्भ लोककलावंत संघटनेच्या वतीने नुकतेच अध्यक्ष संजय कडोळे आणि जिल्ह्यातील कलावंतानी जिल्हाधिकारी वाशिम यांना दिले आहे.