चंद्रपूर : जिल्ह्यात विजबिल न भरल्याने भद्रावती तालुक्यातील तब्बल 65 ग्रामपंचायतींतील पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने खंडित केला आहे. यामुळे ही गावे अंधारात आहेत. तालुका सरपंच संघटनेने एका बैठकीतून महाविरण विज वितरण कंपनीला पुरवठा पूर्ववत करण्यास दोन दिवसाघा अल्टीमेटम दिला आहे. त्यानंतर आंदोलन करण्यात येणार आहे.
भरमसाठ असलेल्या विज बिलामुळे ग्रामपंचायती बिल भरण्यास असमर्थ आहेत. ग्राम पंचायतींचे आर्थिक उत्पन्न कमी असल्याने विज बिल भरणे ग्राम पंचायतींना अडचणींचे ठरत आहे. त्यामुळे ग्राम पंचायतींकडे विज बिल थकले आहे. विद्युत पुरवठा करणा-या विज महावितरण कंपनीने पुरवठा खंडीत करण्याचा सपाटा लावला आहे.
विजबिल न भरल्याने भद्रावती तालुक्यातील तब्बल 65 ग्रामपंचायतींतील पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने खंडित केला आहे. यामुळे ही गावे अंधारात आहेत. तालुका सरपंच संघटनेने एका बैठकीतून महाविरण विज वितरण कंपनीला पुरवठा पूर्ववत करण्यास दोन दिवसाघा अल्टीमेटम दिला आहे. दोन दिवसांत पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरळीत न केल्यास महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा सरपंच संघटनेने दिला आहे. पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर सरपंच संघटनेने पंचायत समितीत बैठक घेतली. पथदिव्यांचे वीजबिल ग्रामपंचायत भरणार नाही. हे बिल शासनाने भरावे याबाबत उद्या सोमवारी उपविभागीय विद्युत कार्यालयाला निवेदन देण्यात येणार आहे. बैठकीत बिल ग्रामपंचायत भरणार नाही ते शासनाने भरावे असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
भटाळी ग्रामपंचायतचे सरपंच सुधाकर रोहणकर यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीला नयन जांभळे, शंकर रासेकर, धनराज पायघन, विजय खंगार, महेंद्र लभाने, रवी ढवस, सुरेश तराळे, संगीता देहारकर, भावना कुरेकार, वंदना दातारकर, छाया जंगम, अनिल खडके, गोविंदा कुळमेथे, गजानन खासरे, एकनाथ घागी, संगीता जुमनाके, मनीषा रोडे, पोर्णिमा ढोक यांच्यासह अन्य सरपंच उपस्थित होते.