कारंजा : आपल्या महाराष्ट्रात उशिरा दाखल झालेला मान्सून जुलैच्या उत्तरार्धात सक्रिय झाला.सदर पावसाने जुलैची सरासरी तर भरून काढली. मात्र ऑगष्ट मध्ये मोठी प्रतिक्षा दिल्याने जवळ जवळ ऑगष्टचा उत्तरार्ध कोरडा गेला आहे. तर भविष्यात माहे सप्टेंबर मध्येही, अल निनोच्या प्रकोपाने अमरावती विभागातील बारा तालुक्यात पाऊसच पडला नाही. इतर उर्वरीत महाराष्ट्रातही परिस्थिती फारशी चांगली नाहीच.त्यामुळे सन 2024 चा उन्हाळ्यात भयंकर दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागणार हे निश्चित आहे.त्यामुळे भविष्याची नांदी ओळखून,ऐन उन्हाळ्याच्या दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून गावकरी,प्रशासन व शासनाने आहे त्या विहीरी,पाझर तलाव, धरणे,जलाशयाचे नियोजन करणे जरूरी झाले आहे.