मानोरा : - अखिल भारतिय नाट्य परिषदेच्या निवडणूकीत, कलावंता सोबत सदृढ संबंध ठेवणारे,निःस्वार्थी,प्रामाणिक, मनमिळाऊ व विश्वासू उमेद्वार मिळाल्याने मानोरा परिसरात नाट्य कलावंतांमध्ये आनंद व्यक्त होत असून,आम्ही मतदान पत्रिकेमधील १) पहिल्या क्रमांकाचे उमेद्वार नंदकिशोर अंबादास कव्हळकर आणि ४) चौथ्या क्रमांकाचे उमेद्वार उज्वल दत्तात्रय देशमुख यांनाच निवडून आणणार असल्याचे मत उपस्थित मानोरा वासी कलावंतानी आमच्या प्रतिनिधी कडे नोंदवीले असून,जे महिला पुरुष कलावंत मतदार काही अडचणी मुळे कलावंत मेळाव्याला उपस्थित राहू शकले नाही.
त्यांनी भ्रमणध्वनी द्वारे आपले मत वृत्त संकलनाकरीता गेलेले आमचे प्रतिनिधी तथा विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचेकडे नोंदविले आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, मानोरा नाट्य परिषद कलावंताकडून,सोमवार दि. १० एप्रिल रोजी नाट्य कलावंताची एकजुट दाखविण्याकरीता व अखिल भारतिय नाट्य परिषद नियामक मंडळ निवडणूक उमेदवार, १) नंदकिशोर अंबादास कव्हळकर तथा ४) उज्वल दत्तात्रय देशमुख यांचे करीता कलावंत मेळावा आणि स्नेह भोजनाचे आयोजन, मानोरा येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनरावजी खुपसे यांचे अध्यक्षतेखाली तथा वृद्ध कलावंत खाडे यांचे उपस्थिती मध्ये मानोरा येथील नाट्य कलावंत सुदाम तायडे योगेश देशमुख राजेंद्र सिह दिक्षीत इंद्रगोल राठोड रवी खुपसे रामभाऊ राठोड पांडूरंग भगत व मानोरा येथील नाट्य परिषदेचे पदाधिकारी व कलावंत यांचे कडून करण्यात आले होते. यावेळी मानोरा येथील कलावंताच्या उमेद्वारावरील सार्थ विश्वासामुळे आजच आपले उमेद्वार निवडून आले असे ग्राह्य धरून सर्वांना पुरणपोळीचे स्वादीष्ट जेवण देऊन शुभेच्छा देण्यात आल्या .