कारंजा (लाड) : कारंजा शहरातील कित्येक वर्षापासून रहिवास असणाऱ्या, मुर्तिजापूर महामार्गावरील स्थानिक
विद्याभारती कॉलनीमध्ये नागरीकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कित्येक वेळा कारंजा नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदने देवूनही सदर समस्यांबाबत कोणतीही ठोस अशी कार्यवाही होतांना दिसत नाही. त्यामुळे अखेरीस सदर समस्यांचे निराकरण व्हावे या उद्देशाने विद्याभारती कॉलनी मधील समस्त नागरिक आणि स्त्री शक्ती मंच संघटनेच्या वतीने,कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या स्थानिक आमदार श्रीमती सईताई डहाके यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. त्यावर लगेच आ.श्रीमती सईताई डहाके यांनी संबधीत अधिकारी यांना समक्ष बोलुन , विद्याभारती कॉलनीतील तीस वर्षापासून कॉलनीमध्ये नळाची व्यवस्था नाही.नाल्याचे बांधकाम नाही.शिवाय रस्ते फुटले आहे. याबाबत लगेच कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच कॉलनी मधील ओपन स्पेस मधील राखीव जागेचे सुशोभीकरण करण्याचा प्रश्न व निकाली काढण्याचे आश्वासन दिले असल्याचे स्त्री शक्ती मंच कारंजाच्या संस्थापक अध्यक्षा सौ. शारदाताई भुयार यांनी कळवीले आहे.