कारंजा (लाड) : नुकत्याच झालेल्या अखिल भारतिय मराठी नाट्य परिषद मुंबईच्या नियामक मंडळाची निवडणूक,मतपत्रिकेच्या माध्यमातून लोकनियुक्त पद्धतीने पार पडलेली असून,संपूर्ण भारतामधून साठ सदस्य निवडून आले आहेत.निवडून आलेल्या सदस्यांनी,केन्द्रियअध्यक्षपदावर, मराठी चित्रपट अभिनेते प्रशांत दामले यांची सर्वानुमते निवड केली असून,मराठी नाट्यपरिषदेच्या कामकाजाला प्रारंभ झाला आहे.नाट्यक्षेत्रातील कलावंताना प्रोत्साहन देवून, त्यांचे न्याय्यहक्क मिळवून देण्यासोबतच,मराठी नाट्य रसिकांकरीता उत्तमोत्तम नाट्यमेजवानी देण्याचे उद्दीष्ट ठेवून,लवकरच देशपातळीवरील अखिल भारतिय मराठी नाट्यपरिषदेचे शंभरावे,अभा मराठी नाट्य संमेलन होऊ घातलेले आहे.त्याची पूर्वतयारी म्हणून सन 2023- 2028 या पंचवार्षिक कार्यकालाकरीता, अध्यक्ष : प्रशांत दामले,उपाध्यक्ष : (प्रशासन) नरेश गडेकर, उपाध्यक्ष : (उपक्रम) भाऊसाहेब भोईर, कोषाध्यक्ष : सतिश लोटके, प्रमुख कार्यवाह : अजित भुरे, सहकार्यवाह : समीर इंदुलकर, दिलीप कोरके, सुनिल ढगे, कार्यकारी समिती सदस्य : विजय चौगुले,सविता मालपेकर,सुशांत शेलार,संजय देसाई,दीपा क्षिरसागर,शंकर रेंगे,गिरीश महाजन,विजय साळुंके,संजय रहाटे, विशाल शिंगाडे, संदिप पाटील यांच्या केन्द्रिय समितीने, विविध समित्या स्थापन केलेल्या असून,सर्वानुमते दुसऱ्यांदा, वाशिम जिल्ह्यामधून नियामक मंडळावर निवडून गेलेल्या, अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या लोकप्रिय कलावंत-नंदकिशोर अंबादास कव्हळकर यांची, "शासकिय योजना पाठपुरावा समिती"वर सदस्य म्हणून निवड केली आहे. या समितीचा उद्देश केन्द्रशासन, महाराष्ट्र शासन, महापालिका,सर्व शासकिय यंत्रणाच्या माध्यमातून, नाट्यपरिषदेकरिता विविध योजना मंजूरी करून आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नंदकिशोर कव्हळकर यांच्या शासकिय योजना समिती पाठपुरावा समितीच्या निवडीचे वृत्त कारंजा शहरात येवून धडकताच, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती श्रीमती सईताई डहाके, कृउबास चे संचालक ब्रिजमोहन मालपाणी, कारंजा नाट्य परिषदेचे ज्येष्ठ मार्गदर्शक रवी सावजी चवरे,श्रीमती राधाताई मुरकुटे,पांडूरंग माने,मोहित जोहरापूरकर,प्रकाश राऊत,डॉ अजय कांत,रविन्द्र नंदाने,अश्विन जगताप,अतुल धाकतोड,आय. के.परमार,रामबकस डेंडूळे,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे, उमेश अनासाने,लोमेश पाटील चौधरी,किशोर धाकतोड,विजय खंडार,देविदास नांदेकर,राजेश चंदन, "जय हो भारत"लघुचित्रपट ईरो फिल्मसचे निर्माते डॉ इम्तियाज लुलानिया,रोमिल लाठीया,आदर्श जय भारत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर गरड,डॉ कलिम मिर्झा, डॉ.आशिष सावजी, कारंजा,विजय बोडखे अमरावती यांनी त्यांची भेट घेऊन,पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करीत पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या प्रतिक्रिया द्या....