कारंजा (लाड) : कारंजा शहर पोलिस स्टेशनच्या आवारात असलेल्या, कारंजा नगरीतील सर्वात प्राचिन,व पंचक्रोशितील पहिल्या असलेल्या,श्री संत गजानन महाराज मंदिरात, सालाबादप्रमाणे,श्रींच्या प्रगटदिना निमित्त सोमवार दि.१३ फेब्रुवारी रोजी प्रातःकाली ०५:०० वाजता,परंपरेप्रमाणे, कारंजा येथील पोलिस उपविभागीय अधिकारी जगदीश पांडे आणि कारंजा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक आधारसिह सोनोने यांचे शुभहस्ते श्रींचा महाभिषेक व महापूजा, सकाळी ०७:०० ते ८ : ३० पर्यंत श्री पिठाचे पूजन ,श्री गणेश पूजन,नवग्रह पूजन,श्रींच्या पादुकांचे पूजन सकाळी ०८: ४५ ते ०९ : ३० पर्यंत होमहवन,श्रींच्या पालखीचे पूजन होईल.त्यानंतर सकाळी १० : १५ वाजता श्रींच्या मंदिरामधून,वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेप्रमाणे सालाबादनुसार कारंजा शहरातून नगर परिक्रमे करीता पालखीचे प्रस्थान होईल. सदर्हु श्रींची पालखी श्री मंदिरातून निघून, महाराणा प्रताप चौक, रामासावजी चौक, मारवाडी पूरा चौक, श्री शनि मंदिर चौक, श्री दत्त मंदिर चौक, मोठे श्रीराम मंदिर, श्रीराम व्यायाम शाळा चौक, टिळक चौक, जुन्या प्रभात टॉकीज मार्गे गांधी चौक, रामा सावजी चौक, चवरे चौक, कंकुबाई श्रविकाश्रम, जे डी चवरे विद्या मंदिर मार्गाने, हटोटीपूरा, छत्रपती संभाजी महाराज चौक, कुंभारपूरा श्री विठ्ठल मंदिर चौक, श्री गुरुमंदिर चौक, बाराभाऊ श्रीराम मंदिर चौक मार्गाने परत श्री मंदिरात पोहचेल.

सदरहु पालखी मध्ये जय भवाणी जय मल्हार गोंधळी वारकरी मंडळ कारंजाचे ( सेवाधारी दिंडी प्रमुख - संजय कडोळे यांच्या नेतृत्वात ) विणेकरी हभप ओंकार महाराज मलवळकर, भालदार चोपदार हभप लोमेश पाटील चौधरी, हभप माणिक महाराज हांडे पाटील, प्रदिप वानखडे, उमेश अनासाने, साईबाबा पंजाबराव ठाकरे सेवारत राहतील. पालखी समोर श्री नागोराव ब्रॉस बॅन्ड पार्टी धनराज जोंधळे यांचे वाद्यसंगीत, रामेश्वर पाटील लाहे आंतरखेड यांचा आणि मतिनभाई यांचे नृत्य करणारे मानाचे ( घोडे ) दोन अश्व, श्रींच्या मुर्ति करीता गंगातिरकर यांचा रथ, श्री महर्षी वाल्मिकी महिला हरिपाठ भजनी मंडळ दिघी, श्री भजनी मंडळ खडी धामणी, श्री सखाराम बाबा (ढोल टाळ) भजनी मंडळ चोहोट्टा बाजार, श्री आसरा माता महिला मंडळ इंदिरा गांधी नगर कारंजा, जय गजानन भजन मंडळ शिवाजी नगर कारंजा, श्री तुळजा भवानी महिला मंडळ वाणीपूरा कारंजा आदी भजनी मंडळाच्या दिंड्या सहभागी होतील.

दुपारी ०३ : ०० वाजता श्रींची पालखी मंदिरात पोहोचताच श्रींची महाआरती होऊन, सर्व दिंडी प्रमुख, भजनी मंडळाचा आणि मान्यवरांचा संस्थानकडून सन्मान होईल . सायंकाळी ठिक ०६ : ०० वाजता, श्री शेगाव संस्थानच्या मुळ प्रथेप्रमाणे, कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या समोरील मुख्य प्रवेशद्वारा पासून, महाप्रसादाकरिता बारी ( रांग ) लागून, रांगेतच महाप्रसादाचे वितरण केले जाईल. तरी श्रींचे सर्वच महाभक्तांनी शिस्तीने,शांतता,सयंम राखून आनंदाने महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री संत गजानन महाराज संस्थान यांनी केले असल्याचे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे. श्रींच्या प्रगटदिन महोत्सवा करीता श्रींच्या मंदिरात निष्काम व निःस्वार्थ सेवा देणारे सुरेश पाटील ठाकरे गुरुजी, गोपाल पुणेवार, शामरावजी नवघरे, गजानन पाटील कडू, राजू असलमोल, राजू चव्हाण श्रींच्या भक्तमंडळीसह अथक परिश्रम घेत आहेत. तसेच श्रींच्या महाप्रसादाकरीता श्री भक्तांनी अन्न धान्य रुपाने जास्तित जास्त सहकार्य करण्याचे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....