वाशिम : भारताचे पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही भारतातील आपत्ती व्यवस्थापनाची सर्वोच्च संस्था आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ द्वारे याची स्थापना आणि राज्य आणि जिल्हा पातळीवर संस्थात्मक यंत्रणांसाठी सक्षम वातावरण निर्माण करणे अनिवार्य आहे. वाशिम जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाची क्षमता वाढविण्यासाठी "आपदा मित्र" प्रशिक्षण कार्यक्रमाला ७ मे रोजी प्रारंभ झाला. रायगड कोलाड येथील आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम आणि आयटस संस्था कोलाड यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते १८ मे या कालावधीत हे प्रशिक्षण महिला व युवकांना बालविकास भवन येथे दिले गेले. प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात वाशिम, रिसोड आणि मालेगाव येथील प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.
हे प्रशिक्षणार्थी 'आपदा मित्र' व 'आपदा सखी' म्हणून पुढील काळात कार्य करणार आहेत. आपत्ती कधीही, कुठेही येऊ शकते. अशा प्रसंगी आपण सज्ज असलो तर आपत्तीचे संकट संधीमध्ये रूपांतरित होऊ शकते. या नंतर सर्व आपदा मित्र व सखी ह्या जिल्ह्यातील आपत्ती मध्ये सापडलेल्या नागरीकसाठी निश्चित मदतीला धाऊन जातील व त्यांची रक्षा सक्षमपणे करतील अश्या प्रकारच्या प्रशिक्षणार्थीना शिक्षित केले गेले. या प्रशिक्षणामध्ये बचाव प्राथमिक उपचार, अग्निशमन तंत्र, सुरक्षित बचाव उपाय, जलद प्रतिसाद प्रणाली, टीमवर्क व समन्वय अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले गेले. कार्यक्रमाला प्रशिक्षक फयाज अहमद, अनिकेत जाधव, रुचिका शिर्के, सौरभ कांबळे, यश पवार वाशिम येथील प्रशिक्षक अनिल वाघ, तसेच माय भारत केंद्र व नेहरू युवा मंडळ केकतउमरा प्रतिनिधी प्रदीप पट्टेबहादूर यांची उपस्थिती होती. प्रशिक्षणात आशा व अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
ह्या मध्ये प्रामुख्याने प्रमीला राठोड, चैताली सानप, सोनू आठवले, पुजा वानखेडे, अश्विनी बकाल, निर्मला खंदारे, राज्यस्तरीय आव्हान शिबिरार्थी कु.आकांक्षा गायकवाड, वैष्णवी खंडारे, प्रमोद सांगळे, अभिजीत पारडे, पवन खोडके, वैभव मंडलिक, पवण कानडे, कार्तिक घुगे, सागर मुंढे, योगेश घुगे, अजिंक्य मेडशीकर सह परिसरातील महीला व युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या संपूर्ण प्रशिक्षणाला वाशिम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, संस्था प्रतिनिधी गजानन मेसरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....