गॅलक्सी कंप्यूटर एज्युकेशन ब्रम्हपुरी येथे दिनांक १४ एप्रिल २०२२ ला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्य MS-CIT मध्ये विशेष प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तु देऊन सत्कार सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी म्हणून नेवजाबाई हितकारिणी कॉलेज ब्रम्हपुरी च्या प्राध्यापिका मान. सौ. ज्योती दुपारे, तसेच श्रीमती वनिताताई धोटे, कपिल गणवीर सर विषयतज्ञ पं.स. ब्रम्हपुरी, राहुल कोडापे सर संचालक गॅलक्सी स्पर्धा परिक्षा केंद्र ब्रम्हपुरी, निरंजन मिसार सर ने. हि. कॉलेज ब्रम्हपुरी हे उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याकरिता मोलाचे मार्गदर्शन केले.
MS-CIT सत्र २०२०-२१ मधील सर्वाधिक १०० टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थीनी जिगीशा मेहेर, प्राजक्ता तुपट, प्रांजली बोरकर, वेदांती लांबकाने आणि विधी नंदेश्वर असून तसेच ९९ व ९८ टक्के गुण संपादन केलेले असे एकूण ४५ विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मानचिन्ह व भेटवस्तु देऊन करण्यात आला. गॅलक्सी कंप्यूटर हे ब्रम्हपुरी परीसरातुन सर्वाधिक नाव लौकीकता मिळविलेले प्रशिक्षण केंद्र असून येथील १०० टक्के यशाची परंपरा कायम आहे.
गॅलक्सी कंप्यूटर एज्युकेशनचे संचालक तथा मार्गदर्शक श्री. शैलेंद्र धोटे व सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन व अभिनंदन व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन कु. रागीनी खरकाटे तर आभार प्रदर्शन कु. साक्षी धोटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सौ. रेखा धोटे, कु. श्रीमयी आणि विशाल वंजारी यांनी अथक परिश्रम घेतले. समारंभाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते..