पेंढरी - गोदेंडा मार्गावरील शेतमाल तपासणी नाक्याजवळ दुचाकी स्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने इले. पोलला गाडीची धडक या अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार झाला. सदर घटना आज सकाळ ९. ३० वाजताच्या सुमारास घडली. मृतक विनायक दादाजी कोरांगे ( ४७) रा. महादवाडी ता. चिमुर असे आहे. चिमूर तालुक्यातील विनायक कोरांगे हा व्यक्ती स्वतः च्या दुचाकीने सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी- गोदेंडा मार्गावरील शेतमाल तपासणी नाका मार्गाने दुचाकीने अवागमन करतांना त्या धडकेत गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.