ब्रम्हपुरी तालुक्यातील डोर्ली येथील शंकर अवसरे वय ४५ हे आपल्या शेतावर शेतपिकाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना सर्पदंश झाला. त्यांना ब्रम्हपुरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तर कुडेसावली येथील काशिनाथ टेंभुर्णे वय ६३ वर्ष ह्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
रामपुरी येथील प्रगती रविंद्र मेश्राम वय २४ वर्ष ही तरुणी कॅन्सर आजाराने ग्रस्त आहे. तिला आमदार विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून शस्त्रक्रियेसाठी नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ह्या तीनही रुग्णांची आर्थिक परिस्थिती गरीबीची आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.
सदरची बाब डोर्ली,कुडेसावली, रामपुरी येथील ग्राम काॅंग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांना कळवताच त्यांनी सदर रुग्णांच्या उपचारासाठी आपल्या स्वतः कडून आर्थिक मदत दिली.
आर्थिक मदत देतांना युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, माजी जि.प. सदस्या स्मिताताई पारधी, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद मोटघरे, आवळगाव सेवा सहकारी संस्थेचे सदस्य किशोर राऊत, माजी सरपंच राजेश पारधी, सरपंच प्रेमानंद मेश्राम, महिला काॅंग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले, नगरसेविका सुनीताताई तिडके, नगरसेविका लताताई ठाकुर, जयाताई कन्नाके यांची यावेळी उपस्थिती होती.