कारंजा : वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील पिंप्री फॉरेस्ट येथील
अडाण धरणाच्या पाण्यामध्ये गूरूवार दि .04 ऑगस्टला, दुपारच्या सत्रात अनोळखी महिलेचे व एका पुरुषाचे प्रेत तरंंगताना आढळून आले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून , धरणावर फिरण्यासाठी जाणार्या नागरिकांना पाण्यामध्ये महिलेची प्रेत तरंगत असल्याचे आढळून आले. याबाबत काही सुजान नागरिकांनी सदर माहिती तात्काळ , सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे प्रमुख श्यामभाऊ सवाई यांना दिली असता,सवाई यांनी तहसीलदार धीरज मांजरे यांना व पोलीस प्रशासनाला माहिती दिली व तातडीने घटनास्थळी स्थानिक इंजोरी येथील सर्वधर्म आपत्कालीन संस्था शाखा रवाना केली व सासचे अजय ढोक व चमू धरणावर जाऊन महिलेचे प्रेत व एका पुरूषाचे पथकातील युवकाच्या मदतीने पाण्याबाहेर काढले. असून महिलेच्या अंगावर लाल रंगाची साडी व पिवळ्या रंगाचा ब्लाऊज आहे. हातावर काळा धागा असून. पुरूषाचे अंगात निळसर रंगाचा फुल ड्रेस असून
लवकरच यांची ओळख पटलेली असून हे प्रेमी युगूल कारंजा येथील इंदिरानगर येथील रहिवाशी असल्याचे कळते. अधिक चौकशी ग्रामिण पोलिस स्टेशन कारंजा करीत आहे . गेल्या उन्हाळ्यात सुद्धा या ठिकाणापासून जवळच गेट परिसरात, दाईपूरा कारंजाच्या दोन मुस्लिम बहिनी आणी त्यानंतर दहापंधरा दिवसातच अमरावती येथील एका महिलेचा धरणात बुडून मृत्यु घडल्याची घटना घडलेली असून, पंचक्रोशीतील ग्रामखेडयातील रहिवाशी धरणाकडे केव्हाही फिरकत नसल्याचे कळते मात्र धरण पाहण्याकरीता पर्यटक आणि प्रेमीयुगुलांचा येथे सर्वत्र दररोजच वावर असल्याची माहिती महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेला यापूर्वीच मिळालेली असून, सुज्ञ नागरिक येथे अडाण प्रकल्प पाटबंधारे विभाग, वनविभाग यांचेकडून चोवीस तास सुरक्षारक्षकांची आणि ग्रामिण पोलिस स्टेशनकडून येथे दररोज दोनतीन वेळा गस्त घालून हौसी पर्यटक प्रेमीयुगुलांना आवर घालण्याचे बोलले जात आहे .